आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवाब मलिकांसोबत ठाकरे सरकार::कारागृहात कैद असलेल्या मंत्र्यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, त्यांचे दोन्ही मंत्रालयाचे काम दुसर्यांकडे सोपवण्यात येणार

मुंबई2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

1993 बाँब स्फोट मधील आरोपी दाउत इब्राहिम च्या जमिन खरेदीशी निगडीत मनी लॉन्ड्रिंग गुन्ह्यात कैद राज्याचे अल्पसंख्यांक कल्याण मंत्री नवाब मलिक यांना ठाकरे सरकारचे समर्थन मिळत आहे. महाराष्ट्राचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी स्पष्ट केले की, मलिकांकडून राजिनामा घेण्यात येणार नाही. जयंत पाटील म्हणाले की, मलिक कारागृहात असल्यामुळे ते काम करू शकत नाहीत, म्हणून तोपर्यंत त्यांच्या कामाची जबाबदारी दुसऱ्या कोणाकडे देण्यात येईल.

तरी, नवाब मलिक यांच्या राजीनाम्यावर विरोधी पक्ष भाजप आक्रमक भुमिकेत आहे. आणि कोणत्याही परिस्थीतीमध्ये त्यांना मलिक यांचा राजिनामा हवा आहे. याप्रकरणी एनसीपी अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी दोन तास एनसीपीच्या मंत्र्यांची बैठक पार पडली. नवाब मलिक यांची मंत्रालयाची जवाबदारी दुसर्या नेत्यावर द्यावी, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. नवाब मलिक यांचा राजिनामा घेण्यात येणार नसल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

मलिकांकडे मंत्रालयाच्या दोन जवाबदार्या:
नवाब मलिकांच्या जवळ सध्या मंत्रालयाच्या दोन जवाबदार्या आहेत. त्यामध्ये अल्पसंख्यक मंत्रालय आणि कौशल्य विकास विभाग. या दोन्ही विभागाची जवाबदारी दुसर्या मंत्र्याकडे देण्यात येणार आहे. कारण महाराष्ट्रात महानगर पालिकांच्या निवडणुका होणार आहेत आणि मलिक हे एनसीपीचे अध्यक्ष आहेत. म्हणुन नरेंद्र राणे आणि राखी जाधव यांना कार्यकारी अध्यक्ष बनविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मलिक यांच्यावर अंडरवर्ल्डकडुन जमिन खरेदीचा आरोप:
9 नोव्हेंबर 2021 ला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीब मलिक यांचे अंडरवल्डशी संबंध असल्याचा खळबळजनक आरोप केला होता. त्यानी दावा केला होता की, नवीब मलिक यांनी दाऊत इब्राहिम च्या टोळींकडून जमिन खरेदी केली आहे. ही जमिन मुंबईच्या बाँब ब्लास्ट मधिल आरोपींची आहे. माजी मुख्यमंत्र्यांनी आरोप केला की, सरदार शाह, वली खान आणि हसीना पारकर याच्या जवळीक सलीम पटेल यांते नवाब मलिक यांच्यासोबत व्यावसायिक संबंध आहेत. या दोन्हीमद्ये मुंबई LBS रोड लगत असणारी कोरोडो रूपयांची जमिन बेभावात मलिक यांच्या नातेवाईकांच्या कंपनीला विकण्यात आली. फडणवीसांच्या मते जमिनीची विक्री ही सरदार शाह वली खान आणि सलीम पटेल यांनी केली. नवाब मलिक देखील काही काळ या कंपनीशी जोडले गेले होते. कुर्ला येथिल LBS रोडवर असलेली ही तीन एक्कर जमिन फक्त 20-30 लाखांत विकली गेली, पण त्या जमिनीची मुळ किंम्मत 3.50 कोटींपेक्षा जास्त होती. माजी मख्यमंत्र्यांनी याचे सर्व पुरावे सेंट्रल एजेंसीज ला देण्याचे सांगितले होते. असे म्हटले जात आहे की, याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी ईडीच्या टीमने मलिक यांना ताब्यात घेतले आहे. परंतु ईडीकडून या प्रकरणाबद्दल कोणतेही विधान केले गेलेले नाही.

बातम्या आणखी आहेत...