आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Prithviraj Chavan Alleges That The Election Commission Had Given Social Media Contracts To BJP Office Bearers During The Maharashtra Assembly Elections

2019 विधानसभा निवडणूक:विधानसभा निवडणुकीच्या काळात निवडणूक आयोगाने भाजप पदाधिकाऱ्याला दिलं होतं सोशल मीडियाचे कंत्राट, पृथ्वीराज चव्हाणांनी पत्र लिहित केली चौकशीची मागणी

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहून चव्हाणांनी केली चौकशीची मागणी

भारतीय निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणूक 2019 च्या वेळी सोशल मीडियाचे कंत्राट हे एका भाजपाच्या पदाधिकाऱ्याला दिले असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. तो पदाधिकारी भाजयुमो आयटी सेलचा राष्ट्रीय संयोजक असल्याचा दावाही पृथ्वीराज चव्हाणांनी केला आहे. या प्रकरणी आपण निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. या बाबत त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. हे पत्र त्यांनी ट्विटवर शेअर केले आहे. 

पृथ्वीराज चव्हाणांनी आरोप केले की, निवडणूक आयोगानं जाहिरात करताना जो पत्ता द्यावा लागतो, तो खासगी कंपनीचा दिला आहे. मात्र जो पत्ता दिला तो Signpost India कंपनीचा पत्ता आहे. याच कंपनीची सोशल सेंट्रल नावाची देखील एक कंपनी आहे. या दोन्ही कंपन्या देवांग दवेच्या असल्याचं ते म्हणाले आहे. देवांग दवे हा आयटी बोर्ड महाराष्ट्र सदस्य असल्याचं ते म्हणाले. असं बोर्ड अधिकृत राज्य सरकारचं नाही. दवे हा भाजप युवा मोर्चा पदाधिकारी आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्याच्या कंपनीला हे कंत्राट कसे काय देण्यात आले असा सवाल चव्हाणांनी आता केला आहे. 

पुढे चव्हाण म्हणाले की, देवांग दवेच्या वेबसाइटवर त्याच्या कंपनीच्या ग्राहकांची यादी देण्यात आलेली आहे. त्यानुसार त्याची कंपनी ‘द फियरलेस इंडियन’, ‘सपोर्ट नरेंद्र मोदीं’ इत्यादी पेजेसची फाउंडर असल्याची माहितीही समोर आलेली आहे. या पेजेसवरुन भाजपाचा प्रचार करण्यात येतो. यासोबतच विरोधी विचारसरणीच्या लोकांबद्दल या पेजेसवरून द्वेष पसरवण्याचे काम केले जात असते. त्याशिवाय इतरही काही सरकारी विभागांचे काम त्याच्या एजन्सीकडून करण्यात आलं असल्याचं त्याच्या वेबसाईटवरून समोर येतं असल्याचंही ते म्हणाले आहेत. तसेच या घटनेची तातडीने सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी अशी विनंती देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहून चव्हाणांनी केली आहे.