आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामोदींचा करिष्मा कमी झाला आहे. तर भारत जोडो यात्रेमुळे राहुल गांधींचा सकारात्मक प्रभाव पडला आहे. कर्नाटकात काँग्रसने ऐतिहासिक विजय मिळवला आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस 129 जागांवर, भाजप 67 जागांवर, जेडीएस 22 आणि इतर 6 जागांवर आघाडीवर आहेत. म्हणजेच काँग्रेसच्या बहुमताच्या 113च्या आकड्यापेक्षा 16 जागा जास्त आहेत. काँग्रेसला 42.8%, भाजपाला 36.1% आणि जेडीएसला 13.2% मते मिळत आहेत.
दक्षिणेचा रस्ता बंद झाला
निवडणुकांच्या निकालावर विविध काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, हा ऐतिहासिक विजय आहे. गेल्या 4 वर्षात भाजपचे राज्य होते. त्यावर लोक नाराज होते. सत्ताबदलाबाबत आम्हाला कोणतीही शंका नव्हती. याबाबत अंदाज होता. भाजपचा दक्षिणेचा रस्ता बंद झाला आहे. येणाऱ्या 3 राज्यातील निवडणुकांवर याचा परिणाम होईल.
यामुळे लोक नाराज
पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले, भाजपच्या हातून दक्षिणेकडील राज्य गेले, उत्तरेकडील किती मिळतात याबाबत शंका आहे. मोदींचा करिष्मा कमी झाल्याचे वाटते. बंगळुरमध्ये पूर आला त्यावेळी कोणीही नेते नव्हते, आणि आता निवडणुका जवळ आल्यावर रॅली, पदयात्रा काढण्यात आल्या. यावर लोक नाराज होतेच. लिंगायत समाजाच्या ज्येष्ठ नेत्याची तिकीटे कापली.
बेळगाव वादावर...
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, राहुल गांधींनी भारत जोडोत कर्नाटकच्या 7 जिल्ह्यात त्यांनी प्रवास केला. सकारात्मक प्रभाव पडला. बेळगाव वादाबाबत काँग्रेस-महाराष्ट्राची भूमिका वेगळी नाही, सुप्रीम कोर्टात वाद प्रलंबित आहे. त्यानंतरच निर्णय घेतला जाईल.
संबंधित वृत्त
राजकारण:मोदी सरकारने लोकशाहीचा खून केला, कर्नाटकात 5 वर्षात भाजपचा भ्रष्टाचारी चेहरा समोर आला; नाना पटोलेंचा घणाघात
नरेंद्र मोदी सरकारने लोकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न केला. 5 वर्षात भाजप सरकारचे कामकाज पाहिल्यास कर्नाटक जनतेवर अत्याचार केले. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या असे अनेक प्रश्न कर्नाटकमध्ये या 5 वर्षात निर्माण झाल्याचा घणाघात महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. वाचा सविस्तर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.