आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिंदे - फडणवीस सरकार हे बेकायदेशीरपणे सत्तेत आले आहे. कोर्टाने ओढलेले ताशेरे हे सरकार घटनाबाह्य आहे हेच सांगत आहेत, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यामुळे त्यांचे सरकार हे वापस आणता येणार नाही. हे कोर्टाने स्पष्ट केले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्याकडे बहुमत नाही, असे मान्य केले म्हणून दुसरा मुख्यमंत्री निवडला जाणे योग्य आहे. मात्र, हे सरकार बेकायदेशीर, असंवैधानिक आहे.
कुणाचा दबाव होता?
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, याच करता पुढची न्यायालयीन कारवाई नक्कीच केली जाईल. इतके गंभीर ताशेरे संविधानिक पदावर बसलेल्या लोकावर ओढले आहे. त्यांच्यावर कुणाचा दबाव होता का? त्यामुळे या बेकायदेशीर सरकारने तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण केली आहे.
अध्यक्षांच्या वर्तवणुकीवर ताशेरे
सुप्रीम कोर्टाने अध्यक्षांच्या वर्तवणुकीवर ताशेरे ओढले आहेत. पंरतु निलंबनाचा निर्णय कोर्टाकडे घेतला नाही, कारण हा निर्णय विधानसभा अध्यक्षांचा आहे. ही बाब त्यांच्याकडे देण्यात आली आहे. लवकरात लवकर हा निर्णय घेण्यात यावे असे कोर्टाने म्हटले आहे.
शिंदे सरकार बेकायदेशीर
मुळातच हे सरकार बेकायदेशीरपणे सत्तेत आले आहे, असे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयातून दिसून आले आहे. संबंध निकाल अजून वाचलेला नाही, तज्ञांशी चर्चा केल्यानंतर अजून सखोल यावर उत्तर देता येईल असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.
संबंधित वृत्त वाचा
'सत्ता'कारण:नैतिकता असेल तर शिंदे - फडणवीस सरकारने राजीनामा द्यावा, हे सरकार पूर्णपणे घटनाबाह्य - संजय राऊत
शिंदे - फडणवीस सरकारने किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी आता उगाच पेढे वाटू नये. आपण बेकायदेशीर सरकारचे प्रतिनिधित्व करत आहात नैतिकता असेल तर आपण राजीनामा द्यावा असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. तर सरकार पूर्णपणे बेकायदेशीर आहे. घटनाबाह्य आहे यावर सुप्रीम कोर्टाने यांच्यावर शिक्कामोर्तब केला आहे, असेही राऊत यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.