आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया:विक्रम गोखले यांनी राजकीय पक्षात प्रवेश करावा, कंगनाला समर्थन दिल्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांची खोचक टीका

मुंबई15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खरे स्वातंत्र्य 1947 ला मिळाले नसून ते 2014 ला मिळाले असे वादग्रस्त वक्तव्य अभिनेत्री कंगना रनोटने केले होते. कंगनाच्या या वक्तव्याला ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी समर्थन दिले आहे. कंगना जी म्हणाली त्यावर मी सहमत असल्याची प्रतिक्रिया गोखले यांनी दिली आहे. त्यावरून आता काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आपले भाष्य केले आहे. गोखले यांनी आता चित्रपटसोडून राजकारण प्रवेश करावा. ते मुख्यमंत्री झाले तर मला प्रचंड आनंद होईल. असे मत चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.

"विक्रम गोखले यांनी राजकीय गोष्टींवर काही बोलण्यापेक्षा राजकीय पक्षात प्रवेश करावा. निवडणुकीला उभे राहून लोकांची मते घ्यावी. ते स्वत: मुख्यमंत्री झाले, तर याचा मलाही आनंद होईल." अशी खोचक टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

गोखले काय म्हणाले होते
विक्रम गोखले यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त ब्राह्मण महासंघाच्या वतीने ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात विक्रम गोखले यांनी अनेक मुद्द्यांवर आपले भाष्य केले. राज्यात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप तसेच शिवसेना- भाजप युती यावर त्यांनी परखडपणे भाष्य केले. त्यानंतर त्यांनी कंगनाने केलेल्या वादग्रस्त वक्तव्याला देखील जाहीरपणे पाठिंबा दिला आहे.

कंगनाने केलेल्या वक्तव्यावर गोखले म्हणाले की, "हे स्वातंत्र्य भीक मागूनच मिळाले आहे. हे स्वातंत्र्य कोणीही दिलेले नाही. आपले स्वातंत्रवीर जेव्हा फाशीवर जात होते तेव्हा फाशीपासून त्यांना वाचवले नाही, हे चुकीचे आहे. मतपेढीचे राजकारण सुरू झाल्यापासून वाद निर्माण होत आहेत."

"लाल बहादूर शास्त्री सोडून आतापर्यंत देशातील सर्व पंतप्रधानांना मी शंभराच्या खाली गुण देतो. पण त्यांची जयंती ही 2 ऑक्टोबरला येते ती हेतुपुरस्सर पुसली जाते. त्याचा विसर पाडला जातो. किती वर्षे कारस्थान आहे? हा देश कधीही हिरवा होणार नाही हा देश भगवा राहिला पाहिजे." असे विधान विक्रम गोखले यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...