आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:तेव्हा सरकार स्थापनेसाठी भाजपला पाठिंबा देण्याचा शरद पवारांचा निरोप घेऊन राष्ट्रवादीचे दोन नेते गेले होते ‘वर्षा’वर फडणवीस यांच्या भेटीला!

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पहाटेच्या शपथविधीवर प्रियम गांधींचे ‘ट्रेडिंग पाॅवर’ पुस्तक, सरकारच्या वर्षपूर्तीच्या तोंडावर इनसाइड स्टोरीने पुन्हा खळबळ

गेल्या वर्षी भाजप नेते देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पहाटे घेतलेल्या शपथविधीने गहजब झाला होता. फक्त ८० तास टिकलेल्या या सरकारच्या स्थापनेमागील नाट्यमय घडामोडी प्रियम गांधी यांनी “ट्रेडिंग पाॅवर’ पुस्तकातुन मांडल्या आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीच्या तोंडावर हे पुस्तक प्रकाशित झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पुस्तकात चक्क तत्कालीन काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना केलेले प्रश्न व पवार यांची उत्तरे आहेत.

पहाटेच्या शपथविधीची तयारी कशी झाली, ही रोचक माहिती यात आहे.नोव्हेंबरमध्ये राष्ट्रवादीचे दोन नेते फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी पोहोचले. शरद पवार भाजपला समर्थन देण्यास तयार असल्याचे संकेत या दोन नेत्यांनी दिले. फडणवीस यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या कानी ही गोष्ट घातली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शहा यांच्या निवासस्थानी शरद पवार, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, फडणवीस यांची बैठक झाली. बैठकीत शरद पवार यांनी महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी भाजपला समर्थन देण्याची इच्छा व्यक्त केली. या बैठकीत खात्यासंदर्भात चर्चा झाली. त्यानंतर राष्ट्रपती राजवट आणण्याचे त्या बैठकीत ठरले. महाराष्ट्रात एक स्थिर सरकार स्थापन होण्याची आवश्यकता आहे, असे पवारांनी बैठकीत सांगितल्याचा दावा या पुस्तकात करण्यात आला आहे.

यापूर्वीही ३ पुस्तके : प्रियम भाजप कार्यकर्त्या आहेत, असा राष्ट्रवादीचा आरोप आहे. तसेच यापूर्वी पहाटेच्या शपथविधीवर सुधीर सूर्यवंशी, कमलेश सुतार आणि जितेंद्र दीक्षित या तिघा पत्रकारांची पुस्तके आलेली आहेत.

ते २८ आमदार कोण? ‘तुमच्या पाठीशी कोण आमदार आहेत, या फडणवीसांच्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले...‘सुनील शेळके, संदीप क्षीरसागर, राजेंद्र शिंगणे, सुनील भुसारी, माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, सुनील टिंगरे, धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके, संजय बनसोडे, नरहरी झिरवळ, बाबासाहेब पाटील, दौलत दरोडा, नितीन पवार, अनिल पाटील, शिवाय तेरा आणखी आहेत, असा दावा पुस्तकात करण्यात आला आहे.

अजित पवारांच्या जागी जयंत पाटलांची नियुक्ती
अजित पवारांच्या जागी जयंत पाटलांची नियुक्ती करण्यात येणार आहे, याची माहिती मिळाल्यानंतरही २८ आमदार भाजपला समर्थन देण्यास तयार झाले. मात्र सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर पहाटेच्या शपथविधीचा प्लॅन पुढे गेला नाही, असे प्रियम यांनी नमूद केले आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser