आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावेगवेगळ्या क्षेत्रातील प्रसिद्ध अशा मुस्लिम महिलांची इंटरनेटवर बदनामी करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. गिटहब या अॅपवर मुस्लिम महिलांचे फोटो अपलोड करुन त्यात आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केला जात आहे. या प्रकरणी शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी मुंबई पोलिसांत एक तक्रार दाखल केली आहे.
तसेच आरोपींना लवकरात-लवकर अटक करावी. अशी मागणी देखील चतुर्वेदी यांनी केली आहे. आपण केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान आश्विनी वैष्णव यांच्याकडे तक्रार केली असून, मात्र ते याची कोणत्याही प्रकारे दखल घेत नसल्याचा आरोप देखील प्रियंका चतुर्वेदी यांनी केला आहे.
दिल्लीतील एका महिलेने या अॅपवर प्रसिद्ध करण्यात आलेले फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर या महिलेने दिल्ली पोलिसांत तक्रार दिली होती. आणि हाच मुद्दा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी उचलून धरला आहे. चतुर्वेदींनी आता मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तसेच सायबर सेलकडे देखील त्यांनी तक्रार दाखल केली आहे. चुकीच्या पद्धतीने महिलांच्या फोटोंचा वापर केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
प्रियंका चतुर्वेदी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले आहे की, मुस्लिम महिलांचे फोटो गिटहब या अॅपवर टाकून त्यांची बदनामी केली जात आहे. याबाबत कायदेशीर कारवाई करण्याची गरज आहे. याप्रकरणातील काहीजण हे मुंबईचे असल्याचेही चतुर्वेदी यांनी सांगितले. दिल्ली पोलिसांना याबाबत कोणताही तपास लागला नाही. ते याप्रकरणाचा छडा लावण्यात असमर्थ ठरले आहेत. त्यामुळे मी मुंबई पोलिसांकडे याप्रकरणाची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी केली आहे. महिलांच्या सन्मान राहणे गरजेचे आहे.
महिलांच्या विरोधात कोणाही काही बोलले तर त्याविरोधात शिवसेना कायमच महिलांच्या समर्थनार्थ उभी राहिली आहे. महिलांच्या परवानगिशिवाय त्यांचे फोटो प्रसिद्ध कसे केले जातात. याचा खुलासा रणे गरजेचे आहे. दरम्यान, केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आश्विनी वैष्णव यांच्याकडे यांच्याकडे याबाबत सांगितले होते, मात्र, त्यांच्याकडून सतर्क असून, कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले होते. मात्र, अद्याप कारवाई झाली नसल्याचे चतुर्वेदी यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.