आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंगाल निवडणुकीवर नेत्यांच्या प्रतिक्रिया:पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ममता बॅनर्जींचे अभिनंदन, बंगालला सहकार्य करण्याचे आश्वासन

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बंगाल कम्युनिस्ट आणि काँग्रेसमुक्त - देवेंद्र फडणवीस

आज पाच राज्यांती विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. यात सर्वांचे लक्ष्य पश्चिम बंगालच्या निवडणुकीवर होते. भाजपने बंगाल निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. बंगालच्या निवडणुकीत तृणमूल विरुद्ध भाजप अशी थेट लढत होती. यात ममता बॅनर्जींच्या नेतृत्वातील तृणमूल काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली आहे. टीएमसीने 210+ जागांवर विजय मिळवलाय, तर भाजपने 75+ जागा मिळवल्या आहेत. दरम्यान, या निकालावर देशातील विविध नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

नरेंद्र मोदी यांच्याकडून ममता बॅनर्जींचे अभिनंदन

बंगाल निवडणुकीत 200+ जागा जिंकण्याचा दावा करणाऱ्या भाजपला 75+ जागांवर समाधान मानावे लागले. दरम्यान, या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जींचे अभिनंद केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटरवरुन म्हटले की, मी ममता बॅनर्जी यांचे अभिनंद करतो. तसेच, या महामारीचा सामना करण्यासाठी भविष्यात होईल ती मदत करण्याचेही आश्वासन यावेळी देतो.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून अभिनंदन
बंगाल निवडणुकीनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ममता यांचे अभिनंद केले आहे. ते म्हणाले की, दीदी बंगालमधील लोकांचा अभिमान टिकवून ठेवण्यासाठी एकट्या लढाई लढत होत्या. दीदींचा विजय झाला आहे. आता आपण सर्वजण राजकारण बाजूला ठेवूया आणि कोविडविरूद्धच्या आपल्या लढाईवर लक्ष केंद्रित करू या..

हा निकाल मोठ्या मनाने स्विकारावा- शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट करत ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केले. त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन म्हटले की, बंगालच्या मतदारांनी भरभरून ममतांना पाठींबा दिला आणि सबंध देशाच्या सत्तेला पराभूत केलं. हा निकाल मोठ्या मनाने स्वीकारायला हवा होता. पण ज्या पद्धतीने तिथे जे चाललंय याला 'रडीचा डाव' एवढंच म्हणता येईल! असे ते म्हणाले.

संघर्ष हा तुमच्या राजकारणाचा स्थायीभाव - राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करुन केले अभिनंदन केले. दरम्यान, त्यांनी संघर्ष हा तुमच्या राजकारणाचा स्थायीभाव राहीला आणि या निवडणुकीत संघर्षाची परिसीमा गाठत तुम्ही हे नेत्रदीपक यश मिळवल्याचे ते म्हणाले.

एका महिलेला पराभूत करण्यासाठी सर्व कामाला लागले होते - नाना पटोले
एका महिलेला पराभूत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांचे संपूर्ण मंत्रिमंडळ, देशभरातील भाजपचे नेते आणि केंद्र सरकारच्या सर्व संस्था देशातील जनतेला वा-यावर सोडून पश्चिम बंगालमध्ये प्रचार करत होते. सत्ता, पैसा, केंद्रीय संस्थांचा प्रचंड गैरवापर करूनही बंगालच्या जनतेने भाजपला पराभूत करून बंगाली समाज आणि संस्कृतीवर आक्रमण करू पाहणा-या हुकुमशाही प्रवृत्तीला त्यांची जागा दाखवून दिली आहे. पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडूतील भाजपच्या पराभवाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला कोरोना संकट हाताळण्यात आलेल्या अपयशावर शिक्कामोर्तब केले आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

बंगाल कम्युनिस्ट आणि काँग्रेसमुक्त - देवेंद्र फडणवीस
पश्चिम बंगाल हा कम्युनिष्ट आणि काँग्रेसमुक्त झाला असून राज्यात आता भगव्याचा बोलबाला सुरु झालाय. ‘बंगालमध्ये भगव्याचं राज्य“आम्हाला बंगालमध्ये आम्हाला अपेक्षित जागा मिळाल्या नसल्या तरी चांगल्या जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसवर टिका करताना ते म्हणाले की, काँग्रेसची अवस्था बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना अशी झाली आहे. शिवसेनेचा संबंध नाही, राष्ट्रवादी आज हरले, काँग्रेसला फटका पण ममता दीदी यशामुळे यांना इतका आनंद झालाय? या निवडणुकीत ममता यांना निवडून यायला दमछाक झाली हेही दिसलं”,असा टोला फडणवीसांनी यांनी पत्रकार परिषदेत लगावला.

भाजपाविरोधात छुपेपणाने सगळे एकत्र आले - चद्रकांत पाटील
आसाममध्ये भाजपा सत्ता राखत आहे. पाँडेचरीमध्ये भाजपा आघाडी सत्तेवर येत आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपाला गेल्या वेळच्या तीन जागांच्या तुलनेत खूप मोठ्या प्रमाणात जागा यावेळी मिळत आहेत. देशामध्ये भारतीय जनता पार्टी हा अत्यंत प्रबळ पक्ष म्हणून पुढे आला आहे व त्याच्या विरोधात इतर सर्वांना एकत्र यावे लागते हे या निवडणुकीत पुन्हा स्पष्ट झाले. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस व डाव्यांनी निवडणुकीतून जवळजवळ माघार घेतली. भाजपाच्या विरोधात काहीजण उघडपणे एकत्र लढतात तर काहीवेळा उघडपणे एकटा लढतो आणि पाठीमागून बाकीचे लढतात. पश्चिम बंगालमध्ये दुसरा प्रकार दिसला. तेथे भाजपाविरोधात छुपेपणाने सगळे एकत्र आले व धृविकरण झाले.

बातम्या आणखी आहेत...