आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पर्यटनाला चालना:महानगरांपासून 300 किमी क्षेत्रात लोक शोधताहेत रम्य ठिकाण, ट्रॅव्हल कंपन्यांनीही शोधली 700 नवी पर्यटनस्थळे; हॉटेल बुकिंगमध्ये 30% सुधारणा

मनीषा भल्ला | मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 83.6% डेस्टिनेशन विवाहाचे मुहूर्त बदलले, 42% लोक मुहूर्ताविनाच विवाहास इच्छुक
  • कोरोनासोबत जगणे लोक आता शिकताहेत... पर्यटन क्षेत्राला सहा महिन्यांत सुधारणेची आशा

देशातील पर्यटन उद्योग हळूहळू रुळावर येत आहे. हॉटेल आणि ट्रॅव्हल उद्योगांशी संबंधित कंपन्या मेकमाय ट्रिप, गोबीबो आणि ओयो यांच्या आकडेवारीनुसार लोकांनी कोरोनामुळे आलेली उदासीनता घालवण्यासाठी घराच्या जवळच छोटे वीकेंड टुरिस्ट स्पॉट शोधण्यास सुरुवात केली आहे. तज्ज्ञांनुसार, २०१९ मध्ये ५ कोटी भारतीयांनी विदेशवारी केली. मात्र, कोरोनामुळे आता दोन वर्षे तरी परदेशात जाण्याचे टाळतील आणि देशातच अशी स्थळे शोधतील. यामुळे आगामी सहा महिन्यांत पर्यटन क्षेत्र चांगली उभारी घेईल अशी आशा आहे. असोचेमच्या पर्यटनविषयक समितीचे चेअरमन सुभाष गोयल यांच्यानुसार, देशात दरवर्षी ५ लाख कोटी रुपयांचा रोजगार फक्त पर्यटन क्षेत्रातून मिळतो. जीडीपीमध्ये याचा वाटा १० टक्के आहे. सुमारे साडेसात कोटी लोक या क्षेत्राशी जोडले गेले आहेत. कोविडमुळे सुमारे ३.८ कोटी लोकांच्या हाताला काम राहिलेले नाही. तरीही सध्याची आकडेवारी पाहता सुभाष गोयल यांच्या मते, सध्या ही गती मंद असली तरी आगामी काळात विक्रमी वेगाने हे क्षेत्र वाटचाल करेल.अनलॉकनंतर देशात पर्यटनाबाबत प्रारंभीचा कल तरी हेच सांगतो आहे. मेक माय ट्रिपचे चिफ ऑपरेटिंग ऑफिसर विपुल प्रकाश सांगतात की, महानगरांपासून ३०० किमीपेक्षा कमी अंतरावर असलेल्या पर्यटनस्थळांबाबत लोक आता विचारणा करू लागले आहेत. सर्वाधिक मागणी हिमाचल, उत्तरांचल, राजस्थान आणि गोव्याबाबत आहे. ७०० हून अधिक नवीन पर्यटनस्थळे शोधून ठेवली आहेत. ओयो कंपनीनुसार, अनलॉकनंतर हॉटेल बुकिंगमध्ये ३०% सुधारणा झाली. व्यावसायिक शहरांत हे प्रमाण ५० टक्क्यांवर आहे. हैदराबाद, गुरुग्राम, कोलकाता, बंगळुरू, अहमदाबादमध्ये लवकरच व्यावसायिक बैठकांमुळे व्यवसायाला वेग येईल. इक्सिगो कंपनीनुसार, “सध्याचा कल पाहता लोक व्हायरससोबत जगणे शिकू लागले आहेत. अनलाॅकनंतर प्रत्येक प्लॅटफॉर्मवर ४० ते ५०% बुकिंग वाढत आहे. कोविडने डेस्टिनेशन वेडिंगवरही परिणाम झाला. वेडिंग्ज डॉट इनचे सीईओ संदीप लोधा यांच्यानुसार, लॉकडाऊनमध्ये रद्द झालेले ८३ टक्के विवाह नव्या तारखांनुसार ठरले आहेत. जुलैमध्येच या तारखांबाबत २५,६०० जणांनी विचारणा केली आहे. आमच्या सर्व्हेनुसार, ४२ टक्के लोक आता मुहूर्त नसले तरी विवाह करू इच्छितात. हा कल पाहता नवे २० वेडिंग डेस्टिनेशन तयार केले आहेत.’

आता वर्क फ्रॉम टुरिस्ट स्पॉट :

आयटी कंपन्यांनी गोव्यात २०० हून अधिक व्हिला बुक केले वर्क फ्रॉम होमसाठी आयटी क्षेत्रातील लोक गोव्यासारखे स्थळ निवडत आहेत. गोव्यातील हायर व्हिलाचे व्यवस्थापक सिधांशू पाटील सांगतात, आयटी कंपन्यांनी आतापर्यंत २५० व्हिला आमच्याकडून किरायाने घेतले आहेत. याचे मासिक भाडे दीड ते दोन लाख आहे. गोवा हॉटेल असोसिएशनचे सचिव जॅक सुखिजा म्हणाले, गोव्यात हॉटेलमध्ये जेवढी बुकिंग झाली त्यात वर्क फ्रॉम होम करणारेच अधिक आहेत.

0