आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:शिवसेनेचे मुंबईत मराठीसोबतच मुस्लिम कार्ड; अमराठी मतांची कसर भरणार का? जुहू आंदोलनातील मोहसीन शेखला दिले प्रमोशन

मुंबई2 महिन्यांपूर्वीलेखक: अशोक अडसूळ
  • कॉपी लिंक
  • मुंबई महापालिकेसाठी मिशन "शंभर’

फेब्रुवारी २०२२ मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना मराठी-मुस्लिम कार्ड खेळणार आहे. भाजपच्या उत्तर भारतीय- गुजराती मतपेटीस त्यायोगे टक्कर देण्याचा सेनेचा प्रयत्न असून त्याचाच भाग म्हणून जुहू आंदोलनातील युवा सैनिक मोहसीन शेख यास संघटनेच्या सहसचिव पदावर बढती देण्यात आली आहे. पुढच्या वर्षीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निर्धारित वेळेत घेण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. प्रभाग रचनेचे काम चालू असून ओबीसी आरक्षणावर लवकरच तोडगा काढला जाणार आहे. यातील मुंबई महापालिकेची निवडणूक सेनेसाठी प्रतिष्ठेची आहे. भाजपची गुजराती (२० टक्के) आणि उत्तर भारतीय (३९ टक्के) मतदारांवर मदार आहे. शिवसेनेकडे मराठी (४२ टक्के) कार्ड आहे. त्यात यावेळी मुस्लिम (२२ टक्के) कार्ड सेना चालवणार आहे. मराठी-मुस्लिम कार्डच्या बळावर सेनेने यावेळी मुंबईत “मिशन नगरसेवक १००’ आखले आहे.

जनआशीर्वाद यात्रेतील टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी युवा सेनेने मंगळवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील निवासस्थानी आंदोलन केले. त्यात मोहसीन शेख या युवा सैनिकाची मोलाची कामगिरी होती. त्याचे बक्षीस म्हणून मोहसीन याची गुरुवारी युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी संघटनेच्या सहसचिवपदी वर्णी लावली. शिवसेनेने यंदा संघटनेच्या दिनदर्शिकेवर मराठीसोबत उर्दू मजकूर छापला आहे. तसेच दक्षिण मुंबईत शिवसेनेच्या नगरसेवकाने अजान स्पर्धा घेतली होती. मुंबईत मराठी मतदार ४२ टक्के असून मुस्लिम मतदार २२ टक्के आहे. भाजपला जो पराभूत करेल तिकडे मुस्लिम मतदारांचा कल असतो.

तीन दशके मित्र असलेल्या शिवसेनेने भाजपशी आता थेट पंगा घेतला आहे. त्यामुळे समाजवादी, एमआयएम, काँग्रेस यांना वैतागलेला मुंबईतला मुस्लिम मतदार यावेळी आपल्याकडे येईल, अशी शिवसेनेची अटकळ आहे. त्या दिशेने सेना नेतृत्व पावले टाकत आहे. मोहसीन शेखची बढती त्याचाच भाग आहे. मुंबईत मराठी ४२, उत्तर भारतीय ३९, मुस्लिम २२ आणि गुजराती २० टक्के मतदार आहेत.

मुंबई महापालिकेसाठी मिशन "शंभर’
मुंबई महापालिकेत २२७ नगरसेवक आहेत. सत्ता स्थापण्यासाठी ११४ नगरसेवकांची गरज असते. २०१७ मध्ये सेनेचे ९३ नगरसेवक आले होते. यावेळी सेनेचे मिशन १०० आहे. राणे फॅक्टरने मराठी मतदार चार्ज झाला आहे. त्याला मुस्लिम मतदारांची जोड सेनेला हवी आहे. एकूण, आपले हिंदुत्व शाबूत ठेवूनही शिवसेना यावेळी मुस्लिम-मराठी हा अभिवन सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग करणार आहे.

बातम्या आणखी आहेत...