आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:132 वर्षे जुन्या किर्लोस्कर समूहाच्या 3 भावांचा संपत्तीचा वादपोहोचला सेबीकडे, जुना करार मान्य करण्यास सर्वांचाच नकार

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वर्ष 2009 मध्ये किर्लोस्कर बंधूंमध्ये कराराचे एक प्रारूप तयार झाले होते, तरीही सर्व होते नाराज

१३२ वर्षे जुन्या किर्लोस्कर उद्योग समूहातील संपत्तीच्या वाटणीचा वाद आता उघडपणे समोर आला आहे. किर्लोस्कर कुटुंबातील तीन भावांमधील हा वाद सेबीच्या दारात पोहोचला आहे. वर्ष २००९ मध्ये तिन्ही भावांच्या कुटुंबात तोडगा काढण्यासाठी एका कराराचे प्रारूप (डीड) तयार करण्यात आले होते. त्यात तिन्ही भावांना जे काही मिळाले होते त्यावरून ते नाखुश होते.

तिन्ही भावांत झालेल्या करारानुसार, संजय किर्लोस्कर यांना किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड (केबीएल) ही कंपनी मिळाली होती. ती वर्ष २०१० पर्यंत समूहाची फ्लॅगशिप कंपनी झाली होती. तिची स्थापना १८८८ मध्ये झाली होती. तिन्ही भावांपैकी सर्वात मोठे भाऊ अतुल आणि सर्वात धाकटे भाऊ राहुल यांना जवळपास सर्वच कंपन्यांची जबाबदारी मिळाली. हे दोन्ही भाऊ एकाच चमूत आहेत. किर्लोस्कर कुटुंबाच्या प्रमुख आणि त्यांची आई सुमन यांचाही त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. या दहा वर्षांत कंपनीच्या नियंत्रणावरून आणि विस्तार करण्यावरून भावांमध्ये भांडणे होत आली आहेत. या कुटुंबाशी परिचित असलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, कुटुंबाचा वारसा सर्व भाऊ आपापल्या व्हिजननुसार विस्तारित करतील, असा विचार या डीडमागे होता. पण प्रत्येक जण तसा विचार करत नव्हता. या कराराला पहिला तडा एक वर्षानंतर म्हणजे वर्ष २०१० मध्येच गेला होता. तेव्हा अतुल आणि राहुल तसेच त्यांच्या असोसिएटने केबीएलचा १३.५ टक्के हिस्सा किर्लोस्कर इंडस्ट्रीजला विकला होता. समूहाचा ट्रेडमार्क आणि कॉपीराइट यावरूनही वाद आहेत. त्याशिवाय ‘केबीएल’च्या गैरव्यवस्थापनाच्या आरोपावरून अतुल आणि राहुल यांनी संजय यांना एनसीएलटीमध्ये ओढले आहे.

इनसायडर ट्रेडिंगचे आरोप; तीन आठवड्यांत येऊ शकतो निर्णय

कंपनीतील हिस्सा विकण्याचे प्रकरण आता सेबीकडे आहे. कारण त्यात इनसायडर ट्रेडिंगचे आरोप झाले आहेत. त्यात काही आरोप तर खूपच गंभीर आहेत. किर्लोस्कर इंडस्ट्रीजने सेबीला एक ई-मेल केला आहे. त्यात व्यवहारांची तपासणी करण्यासाठी संजय यांनी सेबीवर दबाव तयार केला आहे. या मुद्द्यावर दोन्ही बाजूंनी मौन बाळगले आहे. ते काहीही बोलण्यास तयार नाहीत. सूत्रांनी सांगितले की, सेबी चौकशीच्या शेवटच्या टप्प्यात आहे. त्याबाबतचा आदेश दोन-तीन आठवड्यांत येण्याची शक्यता आहे.