आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अडचणीत वाढ:अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात विधानसभेत हक्कभंगाचा ठराव, मुख्यमंत्र्यांचा केला होता एकेरी उल्लेख

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्य सरकारवर सातत्याने टीका करणाऱ्या अर्णव गोस्वामींविरुद्ध शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव दिला आहे.

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले होते. यानंतर राज्य सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतलेल्या रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केला होता. यानंतर आता त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे दिसू लागली आहे. राज्य सरकारवर सातत्याने टीका करणाऱ्या अर्णव गोस्वामींविरुद्ध शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव दिला आहे.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात मांडलेला हक्कभंगाचा ठराव पारित झाल्यास अर्णब गोस्वामींवर सभागृहाकडून कारवाई केली जाऊ शकते. तसेच यापूर्वीही अर्णब गोस्वामींवर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली होती. शिवसेना खासदार अरविंद सावंत अर्णब गोस्वामींवर कारवाई करण्याची मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली होती.