आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदार याद्या प्रसिद्ध:ग्रामपंचायतींसाठी 13 ऑक्टोबरला प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापित राज्यातील ७ हजार ६४९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या १३ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर १८ ऑक्टोबर २०२२ पर्यंत हरकती आणि सूचना दाखल करता येतील, असे राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी (६ ऑक्टोबर) जाहीर केले.

विधानसभा मतदारसंघाच्या ३१ मे २०२२ रोजी अस्तित्वात आलेल्या मतदार याद्या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्या प्रभागनिहाय विभाजित केल्यानंतर १३ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रारूपाच्या स्वरूपात प्रसिद्ध केल्या जातील. त्यावर १८ ऑक्टोबर २०२२ पर्यंत हरकती आणि सूचना दाखल करता येतील. प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या २१ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रसिद्ध होतील. प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरुस्ती इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. कारण विधानसभेच्या संबंधित तारखेला अस्तित्वात असलेल्या याद्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आहे तशा वापरल्या जातात. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे आदी गोष्टी दुरुस्त केल्या जातील.

बातम्या आणखी आहेत...