आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धक्कादायक VIDEO:पुणे-मुंबई एक्सप्रेस-वेवर शिवसैनिकाने बंदुकीचा धाक दाखवत ट्रकला केले ओव्हरटेक, AIMIM च्या खासदारांची गृहमंत्र्यांकडे कारवाईची मागणी

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • इम्तियाज जलील यांनी गृहमंत्री अनिल देशमुख आणि महाराष्ट्र पोलिसांच्या डीजीपी यांनाही टॅग केले आहे.

AIMIM चे खासदार इम्तियाज जलील यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे वरील आहे. यामध्ये एक गाडी बंदुक दाखवून ट्रकला ओव्हरटेक करत असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे या गाडीच्या मागच्या काचेवर शिवसेनेचे वाघाचे चिन्ह आहे. यामुळे या शिवसैनिकावर कारवाई करण्याची मागणी AIMIM चे खासदार इम्तियाज जलील यांनी गृहमंत्री अनिल देखमुख यांच्याकडे केली आहे.

'हे महाराष्ट्रातील पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर आहे ! वाहनवरील लोगो हे सर्व सांगते ! शुक्रवारी रात्री शिवसैनिक त्यांच्या गाडीसाठी मार्गक्रमण करीत असताना रिव्हॉल्व्हर्सचे ब्रँडिंग करीत होते. गृहमंत्री /पोलीस महानिरीक्षक या अधर्मची दखल घेऊ शकतात का!' असा सवाल करत इम्तियाज जलील यांनी गृहमंत्री अनिल देशमुख आणि महाराष्ट्र पोलिसांच्या डीजीपी यांनाही टॅग केले आहे.

या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती गर्दीमधून वाट काढण्यासाठी ड्रायव्हिंग सीटवरुन उजव्या हातात पकडलेली रिव्हॉलव्हर गाडीच्या खिडकीबाहेर काढत असल्याचे दिसत आहे. तसेच ट्रकच्या रांगेमधून पलीकडच्या लेनमध्ये जाताना दिसतो. या गाडीच्या मागच्या काचेवर शिवसेनेचा लोगो आहे. यामुळे ती व्यक्ती शिवसैनिक असल्याचे दिसत आहे.