आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कार ट्रकवर आदळून झालेल्या भीषण अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. जय सावंत आणि विकास सावंत अशी मृतांची नावे आहेत. मंगळवारी रात्री अडीचच्या सुमारास मळवली येथे ही घटना घडली.
पुणे - मुंबई द्रुतगती मार्गावर सतत अपघात होत आहेत. चालकांनी वाहने जपून चालवावीत, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. यातले अनेक अपघात हे रात्री वाहनावरील नियंत्रण सुटल्याने घडत आहेत.
अशी घडली घटना
सिंधुदुर्ग येथील राणे आणि सावंत कुटुंब हे पुण्याहून मुंबईतल्या मुलुंड येथे जात होते. त्यांची कार मळवली येथे आली. तेव्हा कार चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे कार त्याच लेनवर असलेल्या मालवाहू ट्रकवर जाऊन आदळली. या अपघातामध्ये जय सावंत आणि विकास सावंत यांचा मृत्यू झाला, तर अश्विनी राणे आणि आर्या सावंत गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
काही दिवसांपूर्वी दुर्घटना
मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर काही दिवसांपूर्वीही एका कारचा भीषण अपघात झाला होता. मार्गावरील डिव्हाइडरचा रॉड कारच्या मधून आरपार घुसला. त्यामुळे कारचे मोठे नुकसान झाले. मागून काच फोडून घुसलेला रॉड पुढची काच फोडून बाहेर निघाला होता. तर काही दिवसांपूर्वी उर्से टोलनाक्याजवळ कारने ट्रकला मागून धडक दिल्याने तीन प्रवासी ठार झाले होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.