आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएका विकृत शिक्षकाने लपूनछपून पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेसमध्ये महिलांचे व्हिडिओ काढल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. या शिक्षकाला आज रेल्वेतल्या प्रवाशांनी यथेच्छ चोपले. त्यानंतर लोहमार्ग पोलिसांच्या हवाली केले.
मोहम्मद अश्रफ असे या विकृत प्रवाशाचे नाव आहे. त्याच्यावर लोहमार्ग पोलिसांनी त्याच्यावर विनयभंगासह पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून बेड्या ठोकल्यात. पुढील तपास सुरू केला आहे.
नेमके घडले काय?
पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून एक व्यक्ती महिलांचे लपून व्हिडिओ काढत होता. तसेच त्याने अनेक महिलांशी छेडछाड केल्याचेही समजते. या व्यक्तीला आज सिंहगड एक्स्प्रेसमधल्या प्रवाशांनी महिलांचे व्हिडिओ शूट करताना रंगेहाथ पकडले. मोहम्मद अश्रफ असे त्याचे नाव असून, तो एका मदरशामध्ये शिक्षक असल्याचे समजते.
पोलिसांनी ठोकल्या बेड्या
प्रवाशांनी मोहम्मदला महिलांचे व्हिडिओ शुटींग करताना पकडले. त्यानंतर तात्काळ ही बाब टीसींच्या लक्षात आणून दिली. टीसींनी कल्याण पोलिसांना फोन करून माहिती दिली. या दरम्यान पोलिस येईपर्यंत प्रवाशांनी मोहम्मदला पकडून ठेवले. संतापाच्या भरात अनेकांनी त्याला चोप दिला. कल्याण स्थानकावर गाडी येताच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.
सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
सिंहगडच नव्हे, तर इतरही रेल्वेतून अनेक महिला एकट्या प्रवास करतात. मात्र, सर्वच ठिकाणी त्यांच्या छेडछाडीच्या प्रकरणात वाढ झाली आहे. नुकतेच एका विमानात प्रवाशाने एका महिला सहप्रवाशाच्या अंगावर लघुशंका केली होती. ते प्रकरण देशभर गाजले. मात्र, रेल्वेतल्या महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आहे. त्याकडे म्हणावे तितके लक्ष जाताना दिसत नाही. या प्रकरणी आरोपीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.