आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संसदेत गोंधळ:संसदेत पुरुष मार्शलकडून महिला सदस्यांसोबत धक्काबुक्की, राष्ट्रपतींनी केंद्राला विचारणा करण्याची गरज - मलिक

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पुरुष मार्शलकडून संसदेत महिला सदस्यांना धक्काबुक्की करण्यात आली. या प्रकरणावरुन राष्ट्रपती आणि लोकसभा अध्यक्षांनी चिंता व्यक्त केली. परंतु, राष्ट्रपती आणि लोकसभा अध्यक्षांनी याबाबत केंद्राला विचारणा करायला केली पाहिजे होती. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.

संसदेत पुरुष मार्शलने महिला सदस्यांसोबत धक्काबुक्की केली. बळाचा वापर केला. ही घटना अशोभनीय आहे, अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. लोकशाहीत अशाप्रकारची घटना योग्य नाही. यावर लोकसभा अध्यक्ष व राष्ट्रपतींनी चिंता व्यक्त केली. मात्र त्यांनी सरळ- सरळ केंद्रसरकारला याप्रकरणी विचारणा करण्याची गरज होती. मात्र त्यांनी राजकीय दबावामुळे तसे केले नसावे, अशी शंकाही मलिकांनी उपस्थित केली.

शरद पवारांनीही व्यक्त केली नाराजी
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील आपली नाराजी व्यक्त केली. 55 वर्षाच्या संसदीय कारकिर्दीत मी कोणत्याही सभागृहात असं चित्रं पाहिलं नाही. हे पवारांसारख्या नेत्याला अस्वस्थतेतून बोलावं लागलं. माझ्याशी बोलले ते. मीडियाशी बोलले. ते फार अस्वस्थ होते. ज्यांनी संपूर्ण हयात संसदीय राजकारणात घालवली आहे ते सर्व नेते अस्वस्थ होते, असंही पवार यांनी सांगितलं.

नेमकं काय घडलं?
संसदेत 127वं घटना दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आले. मात्र, विमा विधेयकावर दुसऱ्या दिवशी ठरलेलं असतानाही केंद्र सरकारने हे विधेयक चर्चेला मांडले. त्यामुळे विरोधक संतापले. शरद पवार आणि मल्लिकार्जुन खरगेंसह इतर नेत्यांनी त्याला विरोध केला आणि या घटनेचा जोरदार निषेध केला. शिवसेनेसह इतर पक्षाचे नेते वेलमध्ये उतरले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. त्यातच महिला कमांडोजना सभागृहात पाचारण करण्यात आल्याने विरोधक संतापले. त्यात महिला कमांडोजकडून महिला खासदारांना धक्काबुक्की करण्यात आल्याने विरोधकांचा पारा चढला. यामुळे सभागृहात मोठा गोंधळ झाल्याने सभागृहाचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...