आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरोधक आक्रमक:प्रश्नोत्तर तास, लक्षवेधी नसलेले पावसाळी अधिवेशन आजपासून; अजित पवार, अनिल परबांना करणार लक्ष्य

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शेतकरी संघटनांचे 22 मेच्या पत्राचे स्मरण

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. या अधिवेशनात प्रश्नोत्तरे, लक्षवेधी होणार नसून २० हजार कोटींपेक्षा अधिक रकमेच्या पुरवण्या मागण्या मांडण्यात येणार अाहेत. तसेच राज्याचा नवा कृषी कायदा व दोन शक्ती विधेयके मांडली जाणार आहेत. विधानसभेचे सकाळी ११ वाजता सभागृह सुरू होईल. प्रथम तालिका अध्यक्षांची घोषणा होईल. त्यानंतर तारांकीत प्रश्नोत्तर, विधिमंडळाच्या समित्यांचे अहवाल मांडले जातील. त्यानंतर शासकीय विधेयके सादर होतील. त्यामध्ये संयुक्त समितीकडे विचारार्थ असलेले शक्ती विधेयक तसेच विधानसभेकडे विचारार्थ असलेले महाराष्ट्र अनन्य विशेष न्यायालये हे या विधेयकाचा समावेश असेल. शोक प्रस्ताव होईल. ऐनवेळचे शासकीय कामकाज घेण्यात येईल.

विविध सदस्यांकडून १३ अशासकीय विधेयके सादर होतील. सायंकाळी पहिल्या दिवसाचे कामकाज संपुष्टात येईल. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करणारे राज्याचे कृषी विधेयक मांडण्याचा निर्णय अजून गुलदस्त्यात आहे. कार्यक्रम पत्रिकेत उद्या त्याचा ऐनवेळी समावेश केला जाऊ शकतो. मंगळवारी अधिवेशनाचा समारोप असून पुरवणी मागण्यावर चर्चा आणि मंजूर करण्यात येतील. प्रश्नोत्तरांचा तास नाही, लक्षवेधी नाही. त्यामुळे विरोधकांना बोलण्यास या अधिवेशनात वाव नाही. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाने चौकशीला हजर होण्याबाबत तिसरे समन्स बजावले आहे. या अधिवेशनावर देशमुखांच्या संभाव्य अटकेचे सावट आहे.

गडबडीत कृषी विधेयक मंजूर करण्यास विरोध
केंद्रीय कृषी विधेयके बिनशर्त मागे घ्या, या मागणीसाठी सुरू असलेल्या संयुक्त किसान मोर्चाच्या आंदोलनास पाठिंबा देणाऱ्या महविकास आघाडी सरकारने राज्यातील कृषी विधेयके घाईने मंजूर करू नयेत, प्रथम केंद्राचे कृषी कायदे अमान्य असल्याचा स्पष्ट व स्वतंत्र ठराव करावा, अशी मागणी राज्यातील शेतकरी संघटनांनी केली आहे. राज्यातील कृषी कायद्याच्या चर्चेसाठी स्वतंत्र अधिवेशन बोलावून चर्चा घडवून आणावी, मंजुरीपूर्व मसुदा जनतेसाठी खुला करावा, अशी मागणी डॉ. अशोक ढवळे यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि इतरांनी केली आहे.

राज्य सरकारचे वर्तन संशयास्पद : डॉ. अजित नवले
किसान सभेचे डॉ. अजित नवले म्हणाले, एकीकडे विवादित केंद्रीय कृषी कायद्यांना विरोध करायचा आणि दुसरीकडे मात्र मागच्या दाराने या कायद्यांमधील बहुतांश तरतुदी नव्या कायद्याच्या रूपाने महाराष्ट्रात लागू करायच्या हे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे वर्तन अत्यंत निषेधार्ह आणि संशयास्पद आहे. सर्व स्तरावर व्यापक चर्चा घडवून आणा, अशी आमची मागणी आहे.

वाझे प्रकरण तापणार
उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि परिवहन मंत्री व शिवसेना नेते अनिल परब यांना विरोधक लक्ष करतील. निलंबित पोलिस निरिक्षक सचिन वाझेच्या पत्राचा हवाला देऊन विरोधक पवार आणि परब यांच्या चौकशीची मागणी करण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...