आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय संघाचा श्रीलंका दौरा:राहुल द्रविड असू शकतात भारतीय संघाचे नवे प्रशिक्षक, त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ जुलैमध्ये करणार श्रीलंका दौरा

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जुलैमध्ये भारतीय संघ श्रीलंकेचा दौरा करेल

माजी भारतीय कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (NCA) प्रमुख राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ श्रीलंकेचा दौरा करणार आहे. जुलैमध्ये श्रीलंकेविरुद्ध भारताला 3 एकदिवसीय आणि 3 टी -20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. बीसीसीआय यासाठी एक नवीन टीम पाठवेल. पुढील महिन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वात इंग्लंड दौर्‍यावर जाणाऱ्या खेळाडूंचा यात समावेश होणार नाही.

द्रविड या नव्या संघात सामील होतील. बीसीसीआयने अद्याप याची अधिकृत घोषणा केलेली नाही. प्रशिक्षकपदी वरिष्ठ भारतीय संघात सामील होण्याची द्रविड यांची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 2014 मध्ये द्रविड इंग्लंड दौर्‍यावर भारतीय संघाचे फलंदाजी सल्लागार म्हणून काम करत होते.

द्रविडबद्दल बीसीसीआयने काय म्हटले?
NCA मध्ये सामिल होण्यापूर्वी द्रविड हे इंडिया ‘A’ आणि इंडिया अंडर -19 संघाचे प्रशिक्षक होते. BCCI च्या एका अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक आरएस श्रीधर, फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांच्यासह सर्व प्रशिक्षक कर्मचारी टीम इंडियाच्या कसोटी पथकासह इंग्लंड दौर्‍यावर असतील.

अधिकारी म्हणाले- अशा परिस्थितीत द्रविडकडून यंग टीम इंडियाला मार्गदर्शन मिळेल ही चांगली गोष्ट आहे. यापूर्वी त्यांनी इंडिया-A बरोबर काम केले आहे. या दौर्‍यावरही यामधूनच युवा खेळाडू भारतीय संघासाठी निवडले जातील. यामुळे द्रविड त्यांच्यासोबत चांगले जुळवून घेतली.

अंडर -19 आणि इंडिया-A चे प्रशिक्षक राहिले आहेत
द्रविड यांनी 2015 ते 2019 पर्यंत अंडर -19 संघ आणि इंडिया-A च्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळली आहे. त्याच्या प्रशिक्षणाखाली भारताच्या अंडर-19 टीमने 2016 मध्ये विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. या संघाचा कर्णधार ईशान किशन होता आणि ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर आणि खलील अहमदसारखे खेळाडू संघात होते. अंतिम सामन्यात संघाला वेस्ट इंडीजकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते.

2019 मध्ये द्रविड NCA चे डायरेक्टर बनले
2018 मध्ये, द्रविडच्या कोचिंगमध्ये भारतीय अंडर -19 संघ विजेता बनला. पृथ्वी शॉ या संघाचा कर्णधार होता आणि शुभमन गिल, रायन पराग, अभिषेक शर्मा, कमलेश नागरकोटी, शिवम मावी असे खेळाडू यामध्ये होते. BCCI ने 2019 मध्ये द्रविडला NCA चे संचालक म्हणून नेमले होते.

श्रीलंका दौर्‍यासाठी टीम काय असू शकते?
श्रीलंका दौर्‍यासाठी असलेल्या भारतीय संघात शिखर धवन, पृथ्वी शॉ, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन आणि ईशान किशन या खेळाडूंचा समावेश असू शकेल. याशिवाय देवदत्त पाडीक्कल आणि ऋतुराज गायकवाड यांना संधी मिळू शकेल. गोलंदाजांमध्ये कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, भुवनेश्वर कुमार, चेतन साकारिया, दीपक चाहर, खलील अहमद आणि नवदीप सैनी यांना संधी मिळू शकेल.

जुलैमध्ये भारतीय संघ श्रीलंकेचा दौरा करेल
मंडळाने काही दिवसांपूर्वी श्रीलंका दौर्‍याचे वेळापत्रक जाहीर केले होते. 5 जुलै रोजी टीम श्रीलंकेत पोहचेल. यानंतर पहिला एकदिवसीय सामना 13 जुलै रोजी, दुसरा सामना 16 जुलै आणि तिसरा सामना 19 जुलै रोजी खेळला जाईल. यानंतर 3 सामन्यांची टी 20 मालिका खेळली जाईल. पहिला टी -20 22 जुलै रोजी, दुसरा 24 जुलै आणि शेवटचा सामना 27 जुलै रोजी खेळला जाईल. कोलंबोच्या प्रेमादासा स्टेडियमवर सर्व सामने खेळले जातील.

द्रविड यांचे इंटरनॅशनल करिअर
2011 मध्ये द्रविडने आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडले. त्याने टीम इंडियाकडून 164 कसोटी आणि 344 एकदिवसीय सामने खेळले. कसोटीत त्याने 52.31 च्या सरासरीने 13,288 धावा केल्या आहेत. तर, एकदिवसीय सामन्यात त्याने 39.17 च्या सरासरीने 10,889 धावा केल्या. केवळ एका टी-20 मध्ये त्यांच्या नावे 31 रन आहेत. याशिवाय द्रविडने आयपीएलचे 89 सामनेही खेळले. यात त्याने 28.23 च्या सरासरीने 2174 धावा केल्या. द्रविडला त्याच्या मजबूत बचावासाठी वॉल म्हणूनही ओळखले जाते.

बातम्या आणखी आहेत...