आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'आम्हाला तुमची चिंता होती':राहुल गांधींचा संजय राऊतांना फोन; भाजप, मनसे जुने सहकारी पण साधी विचारपूस केली नाही- राऊत

मुंबई11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल रात्री ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना फोन लावून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. संजय राऊत यांनी स्वत: ट्विट तसेच पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली आहे.

संजय राऊत म्हणाले, भारत जोडोत व्यस्त असुनही राहुल यांनी रात्री फोन करुन माझ्या प्रकृतीची विचारपूस केली. आम्हाला तुमची चिंता होती. असे म्हणाले. राजकारणातील सहकाऱ्यास खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात 110 दिवस यातना दिल्या याचे दू:ख वाटणे हीच माणुसकी आहे. हा ओलावा संपला आहे. भारत जोडो यात्रेत तो दिसतोय.

राऊतांची खंत

राऊत म्हणाले, सध्या राजकारणात किती कडवटपणा आला आहे, हे आपल्याला माहिती आहे. राहुल गांधींचा फोन म्हणजे अशा कडवटपणात एक प्रेमाची झुळूक म्हणता येईल. 102 दिवसांनंतर मी तुरुंगातून बाहेर आल्यावर किती लोकांनी माझी चौकशी केली याची मला माहिती आहे. माझा पक्ष, ठाकरे कुटुंबीयांनी तसेच पवार कुटुंबीयांनीही माझी चौकशी केली. मात्र, भाजप, मनसे हे आमचे जुने सहकारी. त्यांनी साधी विचारपूसही केली नाही. त्यातील किती लोकांना माझी चिंता वाटते

राहुल गांधींचे समर्थन नाही

राऊत म्हणाले, राजकारणात मतभेद थोडेफार असतातच. पण, राजकारणाची एक परंपरा आहे ती जपली आहे. राहुल गांधी यांनी ती परंपरा जपली. तसेच, वीर सावरकरांबाबत राहुल गांधींनी जे वक्तव्य केले त्याचे आम्ही समर्थन किंवा बचाव करत नाही. राहुल गांधींच्या त्या वक्तव्याला आमचा विरोधच आहे, असेही राऊतांनी स्पष्ट केले.

मिंधे गटाचा स्वाभिमान खरा नाही

राऊत म्हणाले, भाजप व आमच्यात हाच फरक आहे. आम्ही राहुल गांधींनी सावरकरांबाबत जे वक्तव्य केले, त्याबाबत थेट भूमिका घेतली. पण, राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करूनही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजूनही शांत आहेत. शिवरायांबद्दल असेच वक्तव्य कुणी दुसऱ्याने केले असते तर या लोकांनी काय थयथयाट केला असता. त्यामुळेच स्वाभिमानाच्या ज्या गप्पा मिंधे गट मारतो, त्या गप्पा खऱ्या नाहीत.

माफी मागावीच लागेल

राऊत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केवळ राज्यपालच नव्हे तर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनीही अतिशय वादग्रस्त वक्तव्य केले आहे. याबद्दल दोघांनाही माफी मागावीच लागेल

बातम्या आणखी आहेत...