आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरु आहे. राजकीय घडामोडी अत्यंत वेगाने घडत असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा खासदार सुप्रिया सुळेंना फोन केला. यावरुन आता राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
शरद पवारांनी राजीनामा दिल्याने राहुल गांधी आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन दोघेही खूश नाहीत. दोघांनीही शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना फोन करून वडिलांना राजीनामा मागे घेण्याबाबत सांगितले आहे. पवारांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा. अशी विनंती राहुल गांधी यांनी केली आहे.
अध्यक्षपदी सुप्रिया सुळे कि अजित पवार?
63 वर्षे संसदीय राजकारणात ‘अजिंक्य’ राहिलेले 83 वर्षीय माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी मंगळवारी राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली. राष्ट्रवादीचे अध्यक्षपदही सोडणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच नवा अध्यक्ष निवडीसाठी त्यांनी समितीही जाहीर केली. ‘लोक माझे सांगती’ या आत्मचरित्राच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन कार्यक्रमात पवारांनी ही घोषणा करताच सर्वांना धक्काच बसला. आता अध्यक्षपदी सुप्रिया सुळे कि अजित पवार? याबाबत चर्चा सुरु आहेत.
पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
राहुल गांधी यांच्यासह तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनीही सुप्रिया सुळे यांना शरद पवार यांच्या निर्णयासंदर्भात फोन केला होता. या फोनवर दोघांनीही राजीनामा मागे घेण्याबाबत विनंती केली आहे. तसेच यापाठिमागे असलेले राजकारण जाणून घेण्याचा प्रयत्न राहुल गांधी आणि स्टॅलिन यांनी केला. मात्र याबाबत शरद पवार किंवा सुप्रिया सुळे दोघांच्याही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेल्या नाहीत.
5 मे रोजी बैठक
राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्त्यांनी मनधरणी करूनही निवृत्तीच्या निर्णयावर शरद पवार ठाम आहेत. केवळ दोन दिवसांची मुदत मागून त्यांनी कार्यकर्त्यांचा रोष कमी करण्याचा प्रयत्न केला. बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पवारांना भेटण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. काही कार्यकर्ते व ज्येष्ठ नेत्यांशी त्यांनी चर्चा केली. आता समितीची 5 मे रोजी बैठक होईल. त्यामध्ये नव्या पक्षाध्यक्षांचा निर्णय होऊ शकतो.
संबंधित वृत्त
शरद पवार निवृत्तीवर ठाम: 5 मे रोजी ठरणार राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष; निवड समितीची पहिली पसंती सुप्रिया सुळे यांना
राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्त्यांनी मनधरणी करूनही निवृत्तीच्या निर्णयावर शरद पवार ठाम आहेत. केवळ दोन दिवसांची मुदत मागून त्यांनी कार्यकर्त्यांचा रोष कमी करण्याचा प्रयत्न केला. बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पवारांना भेटण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. काही कार्यकर्ते व ज्येष्ठ नेत्यांशी त्यांनी चर्चा केली. आता समितीची ५ मे रोजी बैठक होईल. तीत नव्या पक्षाध्यक्षांचा निर्णय होऊ शकतो. वाचा सविस्तर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.