आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाँग्रेस नेते राहुल गांधी यांची सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी सुमारे ९ तास चौकशी केली. गेल्या तीन दिवसांत ३० तास चाैकशी झाल्यानंतरही ईडीचे समाधान झालेले नाही. शुक्रवारी पुन्हा त्यांना हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. आतापर्यंत ५० टक्के प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत, असे सूत्रांनी सांगितले. दुसरीकडे बुधवारी दिवसभर राहुल गांधी यांना अटक होणार अशा वावड्या उठत होत्या. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते हवालदिल झाले होते. काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षाचे मुख्यालय आणि ईडी मुख्यालयासमोर उग्र निदर्शने केली. ईडी मुख्यालसमोर टायर पेटवून देण्यात आले.
पाेलिसांनी महिला कार्यकर्त्यांचे कपडे फाडले; खासदाराचा आरोप
निदर्शक महिलांसोबत पोलिसांनी गैरवर्तन केले. काही महिलांचे कपडेही फाडले, असा आरोप तामिळनाडूच्या खासदार ज्योतिमणी यांनी केला. दरम्यान, दिल्लीत गेल्या तीन दिवसांत ८०० पेक्षा अधिक काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. काही खासदारांनी संसद भवनसमोर निदर्शने केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.