आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कसबा, पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीचा काल निकाल लागला. यात कसब्यात रवींद्र धंगेकर तर चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांचा विजय झाला. चिंचवडचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे तर कसब्यातून हिंदू महासंघाच्या आनंद दवे व अभिजीत बिचुकले या तिन्ही नेत्यांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.
राहुल कलाटे यांनी 44 हजार मते मिळवली. अभिजीत बिचुकले यांना 47 मते मिळाली आहेत. आनंद दवे यांना मात्र बिचुकलेंपेक्षा जास्त मते मिळाली आहेत. आनंद दवे यांना 296 मते मिळाली. विशेष बाब म्हणजे या दोघांपेक्षा जास्त मते नोटाला पडली आहे. 1397 मतदारांनी नोटाला मत दिले.
26 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार उमेदवारांना एकूण मतदानाच्या एक षष्ठांश मते मिळणे आवश्यक असते. मात्र काल झालेल्या मतमोजणी मध्ये राहुल कलाटे यांना 44 हजार 112 मते मिळाली आहेत. ही मते न मिळाल्यामुळे कलाटे यांच्यासह 28 पैकी 26 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली.
'मविआ'ला मोठा धक्का
44 हजार मते घेतलेल्या राहुल कलाटे यांच्यामुळेच नाना काटे यांना पराभव सहन करावा लागल्याचा आरोप काल अजित पवार यांनी केला होता. कलाटे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊन काटे यांचा प्रचार केला असता तर काटे विजयी झाले असते. मात्र, त्यांनी निवडणूक लढवल्याने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.