आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Rahul Kanal And Disha Salian | Nitesh Rane Big Statment Disha Salian | Rahul Kanal's Connection In Disha Salian Case? Nitesh Rane Demands To Check CDR

त्या रात्री कनाल कुठे होता?:दिशा सालियन प्रकरणात राहुल कनालचं कनेक्शन? सीडीआर चेक करण्याची नितेश राणे यांची मागणी

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाविकास आघाडी सरकार हे महाराष्ट्र विकणारे आहेत, महाराष्ट्र विकणाऱ्यांसमोर महाराष्ट्र कधी झुकणार नाही असा इशाराही नितेश राणे यांनी दिला आहे.

शिवसेनेचे नेते तथा राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल यांच्या घरावर आयकर विभागाने कारवाई केली आहे. यावरुन भाजप आमदार नितेश राणे यांनी राहुल कनाल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दिशा सालियनबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे दिशा सालियन प्रकरणात दोन्ही पुत्रा-पुत्राची चौकशी सुरू आहे. त्यानंतर आता पुन्हा नितेश राणे यांनी एक नवा दावा केला आहे.

दिशा सालिनय आणि अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या बाबतीत जी घटना घडली आहे, त्यामध्ये राहुल कनालचा तर हात नव्हता ना? सीडीआर चेक करायला हवे. 8 जूनला दिशाचा मृत्यू झाला त्या रात्री हा राहुल कुठे होता, याचा तपास करायला हवा. असा सवाल आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केले आहे.

नितेश राणे यांनी राहुल कनालबाबात अनेक खुलासे केले आहेत. जनतेचा पैसै कोण चोरी करत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, हा डेंटिस्टचा मुलगा कसा काय इतके पैसे कमावतो, राहुल कनाल हा आदित्य ठाकरे यांच्या नाईटलाईफ गँगचा भाग आहे. असा नवीन खुलासा नितेश राणे यांनी केला आहे.

पुढे नितेश राणे म्हणाले की, मुंबईतले हर्बल हुक्का पार्लर हे राहुल कनालचे आहे, तसेच कॅफे बांद्रा नावाचे त्याचे एक रेस्टॉरंट देखील आहे, संध्याकाळी सात नंतर तो कुणासोबत बसतो, त्याला शिर्डी ट्रस्टवर का पाठवले गेले. असा सवाल देखील नितेश राणे यांनी यावेळी उपस्थित केला आहे. तसेच राहुल कनालकडे नेमका कुणाचा पैसा आहे याचा तपास व्हायला हवा अशी मागणीही नितेश राणे यांनी केली आहे.

यापूर्वी देखील राणे यांनी दिशाबद्दल केले होते भाष्य

दिशा सालियन प्रकरणात नारायण राणे यांनी एका पत्रकार परिषदेत खळबळजनक खुलासा केला होता. त्यात त्यांनी म्हटले होते की, दिशाची आत्महत्या नव्हे तर तिची हत्या करण्यात आली आहे. तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचे देखील भाष्य नारायण राणे यांनी केला होता. त्यानंतर दिशाची कुटुंबियांनी राणे पित्रा पुत्रांविरोधात मालवणी पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. सध्या या प्रकरणी नारायण राणे आणि नितेश राणे यांनी चौकशी सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...