आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कारवाई:मुंबईत दोन ठिकाणी धाडी; 2200 रेमडेसिविर कुप्या जप्त; परभणी, कोल्हापुरात काळाबाजार

कारवाई17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) संयुक्त कारवाई करीत सोमवारी रेमडेसिविरचा २,२०० कुप्यांचा साठा जप्त केला. दरम्यान, परभणी आणि कोल्हापुरात रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्या एकूण ४ जणांना अटक करण्यात आली. यात परभणीतील एका परिचारिकेचाही समावेश आहे. मुंबईत काही निर्यातदारांकडे रेमडेसिविरचा साठा असल्याची माहिती मिळाल्यानंतर अंधेरी पूर्वमधील मरोळ भागातील एका औषध कंपनीवर धाड टाकण्यात आली. त्याच्या कंपनीतून २००० कुप्या जप्त करण्यात आल्या तर न्यू मरीन लाइन्स भागातून अन्य एका निर्यातदाराकडून २०० कुप्या जप्त करण्यात आल्या.

परभणीत दाेन इंजेक्शन जप्त
परभणी पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि अन्न व अौषध प्रशासनाने संयुक्त कारवाई करीत नर्सिंग स्टाफ डेंटल कॉलेज येथील दत्ता शिवाजी भालेराव याच्याकडून २ इंजेक्शन व १० हजार रुपये जप्त केले त्याने हे रेमडेसिविर शासकीय रुग्णालयातील परिचारिका नीता केशव काळेकडून १२ हजारांत घेतल्याचे सांगितले.यानंतर परिचारिकेच्या खोलीतून ७५ हजार रुपये रोख आणि तिचा मोबाइल जप्त करण्यात आला. तिने कोविड सेंटरमध्ये कामाला असल्याचा गैरफायदा घेत जिल्हा परिषदेच्या कोविड सेंटरमधून सात इंजेक्शन चोरल्याची कबुली दिली आहे.

कोल्हापुरातही कारवाई : कोल्हापुरात रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या टोळीतील योगिराज राजकुमार वाघमारे आणि पराग विजयकुमार पाटील या दोघांना दोघांना सासणे मैदानावर ११ इंजेक्शनसह पोलिसांनी अटक केली.

बातम्या आणखी आहेत...