आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्रमिक ट्रेन:उद्धव ठाकरे आणि रेल्वेमंत्री यांच्यात वाद, पीयूष गोयल यांनी 5 तासात 9 ट्विट करुन महाराष्ट्र सरकारकडे माहिती मागितली; रात्री 2 वाजता 10 व्या ट्विटमध्ये म्हणाले - अद्याप पूर्ण यादी मिळाली नाही

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रेल्वे पुरेशा गाड्या पुरवित नसल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला होता आरोप
  • आशा करतो पहिल्याप्रमाणे रेल्वे स्टेशनवरून रिकाम्या परतणार नाही, गोयल यांचा पलटवार

श्रमिक रेल्वेच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. रेल्वे राज्यातील मजुरांसाठी पुरेशा गाड्या देत नसल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी रविवारी केला होता. मुख्यमंत्र्यांच्या आरोपाला पलटवार देत रेल्वेमंत्र्यांनी रविवारी संध्याकाळी 7 ते 12 या वेळेत 9 वेळा ट्वीट करून महाराष्ट्र सरकारकडे माहिती मागितली, परंतु त्याबाबत तपशील मिळाला नाही. पहाटे 2 वाजता गोयल यांनी 10वे ट्वीट करत सांगितले की 125 गाड्यांची यादी मागविली होती. परंतु केवळ 46 गाड्यापुरतीच माहिती प्राप्त झाली.गोयल यांनी संध्याकाळी 7.14 वाजता प्रथम एकत्र 3 ट्विट केले. उद्धव ठाकरे यांनाही त्यांनी टोला लगावला. गोयल म्हणाले- गाड्या स्टेशनवर आल्या की रिक्त परतणार नाहीत अशी आशा करतो. 

49 मिनिटांनंतर चौथे ट्वीट 

53 मिनिटांनंतर पुन्हा 2 ट्वीट

1 तास 2 मिनिटांनंतर 7 वे ट्वीट 

16 मिनिटांनंतर पुन्हा 2 ट्वीट 

2 तासानंतर रात्री 2.11 वाजता 10 वे ट्वीट 

बातम्या आणखी आहेत...