आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:आठ हजारहून जास्त रेल्वेगाड्यांची वेळ बदलणार, 1 हजार अपग्रेड तर 500 गाड्या बंद होऊ शकतात

रतलाम2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आयआयटी मुंबईच्या मदतीने रेल्वेने केली नव्या वेळापत्रकाची आखणी

लॉकडाऊनमध्ये रेल्वे बंद होण्याचा लाभ घेत रेल्वेने आयआयटी मुंबईच्या सहकार्याने नवीन वेळापत्रक तयार केले आहे. हे वेळापत्रक असे आखले गेले की यामुळे केवळ गाड्यांची गतीच वाढणार नाही तर संचालनाचा वेळही वाचणार आहे. यात सुमारे ८२०२ प्रवासी गाड्यांच्या वेळेत ५ मिनिटांपासून ते दीड तासापर्यंतच्या वेळेत बदल होईल. याशिवाय लॉकडाऊननंतर बंद पडलेल्या ७३ विभागांतील खूपच कमी प्रवासी संख्या असलेल्या आणि कमी मागणी असलेल्या ५०० वर रेल्वेगाड्या आता सुरू होण्याची शक्यता कमी आहे. त्याऐवजी एक हजारावर पॅसेंजर गाड्यांना एक्स्प्रेस आणि एक्स्प्रेस गाड्यांना मेल व सुपरफास्ट गाड्यांमध्ये अपग्रेड केले जाईल.

नुकसान इतकेच की, १० हजार छोट्या स्थानकांचा थांबा आता बंद होईल. रेल्वेने या नव्या वेळापत्रकाला झीरो बेस्ड टाइम टेबल असे नाव दिले आहे. मागील दीड वर्षापासून यावर काम सुरू होते. अंतिम प्रेझेंटेशन बघितल्यानंतर रेल्वे बोर्डाने यात काही बदलही केले. यात अनलॉकनंतर नियमितऐवजी झीरो (शून्य) नंबरच्या विशेष गाड्या चालवण्यास सुरुवात करण्यात आली होती. काेरोना नियंत्रणात राहिल्यास २०२२ मध्ये हे वेळापत्रक लागू करण्यात येईल.

वेग वाढवून संचालन काळ वाचवणार, यामुळे रेल्वेची कमाईही वाढणार
वेग
: पॅसेंजर गाड्यांचा सरासरी वेग वाढेल. आता जास्तीत जास्त वेग ६० ते ८० किमी प्रतितास आहे. तो १३० ते १६० किमीपर्यंत वाढवला जाईल.
संसाधने : डबे, इंजिन, क्रू आणि मेंटेनन्स डेपोचा जास्त वापर होईल. क्षमताही वाढेल. शेड्यूल सुधारल्याने कर्मचारी जास्त गाड्यांचे संचालन करतील.
कमाई : वर्षाला १५०० कोटी रुपये कमाईचा अंदाज. प्रवासी गाड्यांचा संचालन वेळ घटल्याने रेल्वे जास्तीत जास्त मालगाड्या चालवू शकेल.
वेळ : वेग वाढल्यास व थांबे घटल्यास प्रवासी ५ मिनिटे ते दीड तास आधी पोहोचतील. यामुळे मनुष्यबळ व गाड्या चालवण्यावरील खर्चही वाचेल.

झीरो बेस्ड टाइम टेबलचे फायदे
टाइम टेबल असा तयार केला जातो ज्यात वेळ वाया न घालवता गाड्या एकामागे एक चालू शकतील. कमी मागणी असलेल्या गाड्या बंद आणि कमी प्रवासी असलेले थांबे बंद केले जातात. अशा गाड्या ज्यात पूर्ण वर्षभरात ५० टक्क्यांपेक्षा कमी प्रवासी असतात, त्या बंद करून प्रवाशांसाठी या गाड्या पर्याय म्हणून सोडल्या जातात.

बातम्या आणखी आहेत...