आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाचा अंदाज:ठाणे, पालघर, मुंबई, रायगड येथे तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता, हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट

मुंबई7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मंगळवारनंतर पाऊस कमी होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

गेल्या आठवडाभरापासून राज्यातील विविध भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळत आहेत. मुंबईसह आजुबाजूच्या परीसरामध्ये देखील जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे. सोमवारी देखील मुंबई पावसाने चिंब भिजली होती. आता मंगळवारी देखील पालघर, ठाणे, मुंबई परिसरात पावसाचा जोर कायम असण्याची शक्यता आहे. यानंतर पावसाचा प्रभाव ओसरणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान मंगळवारच्या पावसामुळे आज पालघरला ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरालाही तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र झालेले आहेत. याची तीव्रता गुजरातमध्ये देखील आहे. याचाच परीणाम कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरात तसेच विदर्भावर असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. याच्या प्रभावामुळे तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आहे. ठाणे, पालघर, मुंबई, रायगड येथे तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर घाट परिसरामध्ये देखील हा प्रभाव दिसणार आहे. मात्र मंगळवारनंतर पाऊस कमी होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...