आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवामान खात्याचा अंदाज:राज्यात पावसाची संततधार सुरूच राहणार, येत्या 48 तासांत कोकण, मराठवाडा आणि विदर्भातही मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 24 व 25 तारखेला बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे.

मुंबईतील प्रादेशिक हवामान विभागच्या वतीने हवामानाचा अंदाज जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरूच राहणार असल्याची माहिती हवामान विभागाच्या अधिकारी शुभांगी भुतेंनी दिली आहे. आज आणि उद्या सुद्धा राज्यात पाऊस सुरूच राहील असे त्या म्हणाल्या.

24 व 25 तारखेला बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. यामुळे येत्या काही दिवसात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. यासोबतच येत्या 48 तासांमध्ये कोकण, मराठवाडा आणि विदर्भातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर आज रायगड, रत्नागिरी आणि पालघरला ऑरेंज अलर्ट दिला आहे. महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

तर येत्या 5 दिवसाचा हवामान खात्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे

बातम्या आणखी आहेत...