आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत रात्रीपासून पाऊस:मुंबईत मान्सूनच्या एका दिवसाआधीच पावसाची हजेरी; मुसळधार पावसामुळे लोकल ट्रॅकवर साचले पाणी

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबईतील किंग्ज सर्कल, सायन, हिंदमाता परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले

राज्यात मान्सूनचे आगमन झाले आहे. हवामान खात्याकडून याबाबत घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबईत मान्सूनचे जोरदार आगमन झाल्याचे पाहायला मिळत आहे. काल रात्रीपासून होत असलेल्या पावसामुळे अनेक भागात पाणी साचल्याचे चित्र आहे. मुंबईतील अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, गोरेगाव या उपनगरांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तसेच, मुलुंड, भांडूप, घाटकोपर, चेंबूर या परिसरातही पावसाची रिमझिम सुरु आहे.

दरम्यान, मुंबईत सकाळपासून पडत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे लोकल वाहतुकीवर परिणाम झाला आहे. या पावसामुळे मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. सायन रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याचे दिसत आहे. यासह इतरही अनेक रेल्वे स्थानकांमध्येही पाणी भरल्यामुळे ट्रॅक पाण्याखाली गेल्याचे चित्र आहे.

हवामान खात्याचे डेप्यूटी डायरेक्टर जनरल, डॉ. जयंता सरकार यांनी सांगितले की, नेहमी मान्सून 10 ते 12 जूनदरम्यान येतो. पण, यंदा मान्सूनचे लवकर आगमन झाले आहे. यामुळे 9 ते 12 जूनदरम्यन मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे मुंबई आणि उपनगर परिसरात बुधवारी सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. रात्रीपासून पडत असलेल्या पावसामुळे मुंबईतील सखल भागांमध्ये साचण्यास सुरुवात झाली आहे.

या भागांमध्ये पाणी साचले

मुंबईमध्ये बुधवारी सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे किंग सर्कल, सायन, अंधेरी, चेंबूर, बोरिवाली, कांदिवली आणि घाटकोपर परिसरात गुडघ्यापर्यंत पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनांना पाण्यातून वाट काढणे अवघड झाले आहे. परिणामी या भागात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. शिवाय, या पाण्यामुळे अनेक ठिकाणी गाड्या अडकून पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सध्या महापालिका आणि पोलिस विभाग रस्त्यांवर तैनात आहे. थोड्याचवेळात समुद्रालाही मोठी भरती येणार आहे. या काळात पाऊस असाच सुरु राहिल्यास या भागांमध्ये आणखी पाणी तुंबण्याची शक्यता आहे. या महामारीच्या काळात पावसामुळे मुंबईकरांचा त्रास वाढण्याची शक्यता आहे.

राज्यातील इतर जिल्ह्यात पावसाचे आगमन

मान्सूनचे मुंबईसह राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही आगमन झाले आहे. किनारपट्टीवर अललेल्या कोकणातील सिंधुदुर्ग, पालघर, रायगड आणि ठाण्यातही पावसाला सुरुवात झाली आहे. तिकडे, रायगड जिल्ह्यात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. 10 आणि 11 जूनला रायगड जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन सतर्क झाले आहे. तसेच, समुद्र, खाडीकिनारी राहण्याऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...