आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएकीकडे राज्यात उन्हाचा तडाखा कायम असताना, दुसरीकडे मात्र हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली आहे त्यामुळे राज्यात अवकाळीचे संकट कायम आहे. काल सोलापूर जिल्ह्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अवकाळी पावसाने फळबागांसह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. सोलापूरच्या सांगोला तालुक्यात अवकाळीने मोठे नुकसान झाले आहे. आता पुन्हा राज्यात पुढील 4 ते 5 दिवस पावसाचा अंदाज, हवामान विभागाने वर्तविला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 4 ते 5 दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी कडकडाटासह जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून उष्णतेची लाट कायम आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र विदर्भात तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. उत्तरेकडून उष्ण हवा राज्यातून महाराष्ट्राच्या दिशेने येत आहे. राज्यातील हवामान कोरडे आहे. दरम्यान, रविवारी सांगोला तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली, त्यामुळे फळबागांसह भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, राज्यात उष्णतेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे. तापमानात देखील सातत्याने वाढ होते आहे. अनेक शहरांमध्ये तापमान कमालीचे वाढले आहे. दरम्यान उष्णतेचे तापमान देखील वाढले आहे, वाढत्या उष्माघाताने अनेकांचा मृत्यू देखील झाला आहे. अशातच उष्माघातामुळे चार जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. जळगावमध्ये एका जणाचा मृत्यू झाला आहे. नागपूरमध्ये उष्माघाताने दोघांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून उष्णतेचा पार सतत वाढत असल्याने अंगाची लाही-लाही होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक घराबाहेर न पडतांना देखील विचार करत आहेत. दरम्यान सावलीचा व थंड पेयाचा आधार घेत आहेत. जळगाव आणि विदर्भात उन्हाने कहर केला आहे. नागपूर शहरातील सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत रिजर्व बँक चौकात एका व्यक्तीचा उष्मघाताने मृत्यू झाला आहे. तर दुसरी घटना कॉटन मार्केट परिसरात घडली आहे.
उष्माघाताने शेतमजुराचा मृत्यू
जळगावात आणखी एकाचा उष्माघाताने बळी घेतला आहे. चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबार येथील 48 वर्षीय शेतमजुराचा उष्मघाताने मृत्यू झाला आहे. उष्णाघाताचा चाळीसगाव तालुक्यात पहिला तर जळगाव जिल्ह्यातील दुसरा बळी गेल्याने संपुर्ण जळगाव जिल्हा हादरला आहे. सुंदरलाल सुकदेव गढरी असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सुंदरलाल सुकदेव गढरी हे सकाळी नेहमीप्रमाणे बकऱ्या चारण्यासाठी गेले असतांना त्यांना अचानक चक्कर आल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.