आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Rain Update Maharashtra | Weather Of Today In Maharashtra | ​​​​​​​Yellow Alert West Maharashtra, Marathwada And Vidarbha, Including Konkan; Dho Dho Will Collapse For The Next 5 Days

आजपासून पावसाचा जोर आणखी वाढणार:​​​​​​​कोकणसह पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा-विदर्भात यलो अलर्ट; पुढील 5 दिवस कोसळधार

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याच्या अनेक भागात पाऊस कोसळत आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर यासह मराठवाडा आणि विदर्भात देखील मुसळधार पावसाच्या सरी कोसळताना पाहायला मिळत आहे. दरम्यान, आजपासून राज्यातील पावसाचा जोर आणखीणच वाढणार असून, सकाळापासून अनेक भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. भारतीय हवामान विभागाने आज कोकणासह, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. तसेच पुढील पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे.

रात्रीपासून नवी मुंबईसह पनवेल परिसरात विजेच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे. तर तिकडे मराठवाड्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली असून, औरंगाबाद, जालना, परभणी या जिल्ह्यात काल मुसळधार पाऊस पडला. तसेच दिवसभराच्या दमट वातावरणानंतर नागपुरात देखील विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला.

पिकांना जीवदान

गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यातील अनेक भागात पावसाने दडी मारली होती. त्यामुळे अनेक भागात पिके करपण्यास सुरुवात झाली होती. मात्र, पावसाने हजेरी लावल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे. त्यामुळे बळीराजा आनंदात आहे. राज्यात मुंबईसह ठाणे परिसरात पावसाने चांगलीच हजेरी लावली. त्याचबरोबर रत्नागिरी, पुणे, सिंधुदुर्ग, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली. तसेच अमरावती जिल्ह्यातही चांगला पाऊस झाला आहे.

पावसाचा जोर वाढणार

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार असून, वादळी वाऱ्यासह आज पावसाची शक्यता आहे. नंदूरबार, धुळे, जळगाव, पालघर आणि ठाणे वगळता संपूर्ण राज्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, राज्याच्या विविध भागात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे.

आत्तापर्यंत राज्यात चांगला पाऊस

जूनपासून आत्तापर्यंत राज्यातील बहुतांश ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. आत्तापर्यंत राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, राज्यात चांगला पाऊस झाल्यामुळं नदी (Raiver) आणि धरणांच्या (Dam) पाणी पातळीत वाढ झाली आहे. महाराष्ट्रातील लहान, मध्यम आणि मोठ्या धरणांमध्ये मिळून 85 टक्के पाणीसाठा आहे. यावर्षी राज्यातील बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला आहे. या पावसाचा काही ठिकाणी फटका देखील बसला आहे. मात्र, आत्तापर्यंत राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळं धरणांच्या पाणीसाठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे. आत्तापर्यंत राज्यातील लहान, मध्यम आणि मोठ्या धरणांमध्ये मिळून 85 टक्के पाणीसाठा झाला. मागील वर्षी याच काळात पाणी प्रकल्पाचा पाणी साठा हा 67 टक्क्यांवर होता. त्यामानानं यावर्षी पाण्याच्या साठ्यात मोठी वाढ झाली आहे.

तुलनेत अधिकचा पाऊस

गेल्या शुक्रवारपासून पावसाचा जोर अधिक वाढताना पाहायला मिळाला. त्यामुळे गेल्या चार दिवसांत अपेक्षित पावसाच्या तुलनेत अधिकचा पाऊस झाला आहे. 1 ते 4 सप्टेंबरदरम्यान मराठवाड्यात 16.6 मिमी अपेक्षित पावसाच्या तुलनेत 21.5 मिमी पाऊस पडला आहे. या चार दिवसात झालेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाला आहे.

बातम्या आणखी आहेत...