आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पावसाच्या सरी:राज्यातील काही भागांमध्ये पावसाला सुरुवात, मुंबई-ठाण्यासह अनेक भागांमध्ये रिमझिम पाऊस सुरू

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे आजही राज्याभर पाऊस कोसळणार आहे.

मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक भागांत पुन्हा एकदा पाऊस सुरुवात झाली आहे. मुंबई व ठाणे जिल्ह्यात सकाळपासून पावसाची रिमझिम सुरू आहे. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे आजही राज्याभर पाऊस कोसळणार आहे. तसेच अनेक ठिकाणी थंडीचा पारा वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

ठाण्याच्या काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. यामुळे आठवड्याच्या पहिल्या दिवशी कामासाठी बाहेर पडलेल्या चाकरमान्यांची धावपळ झाली. घराबाहेर पडण्याआधी छत्र्यांची शोधाशोध करावी लागणार आहे. सकाळपासूनच मुंबई, नवी मुंबई , पालघर , वसई-विरार , नाशिक या शहरांमध्ये पावसाच्या सरी बरसल्या आहेत.

यासोबतच पुढच्या 24 तासांत मुंबई, पुण्यासह नागपूर परिसरात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हिवाळा सुरू झाला आहे. मात्र अचानक पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या काही वर्षांपासून निसर्गचक्रात बरेच बदल झालेले दिसत आहेत. यामुळे कोणत्याही ऋतूत पावसाच्या सरी बरसत आहेत.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser