आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Rains In Maharashtra: Bhamragarh Tehsil Lost Contact With Headquarters Due To Heavy Rains In Gadchiroli, Roads, Shops And Houses Were Submerged In Water

महाराष्ट्र:​​​​​​​गडचिरोलीमध्ये तुफान पाऊस, भामरागड तहसीलचा मुख्यालयाशी संपर्क तुटला, रस्ते, दुकान आणि घरं पाण्यात बुडाले

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • येथे प्रशासनाकडून जनतेला सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यासाठी काम सुरू करण्यात आले आहेत
  • नागपूर हवामान विभागाकडून परिसरात पुढच्या 24 तासांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे

गडचिरोली येथे गेल्या तीन दिवसांपासून पाऊस पडत आहे. त्याचा परिणाम रविवारी भामरागड तहसीलमध्ये दिसून आला. येथे मुसळधार पावसामुळे तहसीलचा मोठा भाग पाण्यात बुडाला आहे. रस्ते तलाव बनले आहेत. यामुळे रविवारी मुख्यालयाशी येथील परिसराचा संपर्क तुटला आहे. येथे जनतेला सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे.

ताज्या माहितीनुसार भामरागडमधील अनेक दुकाने आणि घरांमध्ये पाणी शिरले आहे. रात्री उशिरा 500 हून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. बर्‍याच ठिकाणी पाणी साचल्यामुळे केवळ घरांचे छतच दिसत आहेत.

सध्या जोरदार पाऊस सुरू आहे आणि नागपूर हवामान विभागानुसार, परिसरामध्ये पुढच्या 24 तासांमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो.

येत्या 24 तासांत गुजरात, कोकण गोवा, मध्यवर्ती महाराष्ट्र, ओडिशा, उत्तर किनारपट्टीवरील भाग, तेलंगणाच्या काही भाग आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगाल येथे मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, दक्षिण आणि पूर्व राजस्थान, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेशात काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. एक किंवा दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...