आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप खासदाराकडून धमकी:राज ठाकरेंनी प्रभू रामाच्या वंशजांना त्रास दिला; अयोध्येत आले तर या, पण जाता कसे ते आम्ही पाहू -बृजभूषणसिंह

मुंबई10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

''राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील उत्तर भारतीयांना त्रास दिला, त्यांचे रोजगार हिरावले, राज यांची नियत चांगली नाही ते अयोध्येत दर्शनासाठी नव्हे तर प्रचारासाठी येत आहेत अशा शब्दात अयोध्येचे खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंवर टीका केली. उत्तर भारतीयांना त्रास देणार नाही हे त्यांनी स्पष्ट करून माफी मागीतली तरच त्यांना अयोध्येत प्रवेश देऊ असेही ते म्हणाले.

माध्यमांशी बोलताना बृजभूषण सिंह म्हणाले की, अयोध्येत राज यांनी जरूर यावे पण आधी माफी मागावी. त्यांनी उत्तर भारत आणि दक्षिण भारताचा मुद्दा येथे आल्यावर वाजवू नये, आपली पुर्वीची उत्तर भारतीयांबद्दलची भूमिका सोडावी, माणसामाणसांत त्यांनी भेद करू नये असेही ते म्हणाले.

राज जहाजात बसतील पण त्यांना त्यातून उतरता येणार नाही.

राज यांनी योगी आदित्यनाथ, पंतप्रधानांवर टिका केली होती. अयोध्येची लोक महाराष्ट्रात राहतात त्यांनाही राज यांनी त्रास दिला अर्थातच प्रभू रामाच्या वंशजांना महाराष्ट्रात त्यांनी मारहाण केली होती, रामाच्या वंशजांना मारहाण करण्याचा त्यांना अधिकार नाही. ते माफी न मागता आलेच तर इशारा देताना बृजभूषण म्हणाले की, ते जहाजात बसतीलही पण त्यांना त्यातून उतरता येणार नाही अशा शब्दात त्यांनी राज यांना इशारा दिला.

मनसैनिक आम्हाला गुन्हेगार म्हणतात

महाराष्ट्रातील लोकांचे फोन येतात आणि युपीतील 65 टक्के लोक गुन्हेगार आहेत असे म्हणतात, आमची ते रोजी रोटीही हिसकावतात आमच्यावर हेच आरोप करतात आणि आता आमच्याच राज्यात येत राजकारण करणार आहेत. त्यांनी दर्शनासाठी खुशाल यावे. माफी मागून आले तर त्यांचे स्वागत होईल जर ते माफी मागून येत नसल्यास त्यांची खैर नाही असेही ते म्हणाले.

अयोध्येतच नव्हे तर पुर्ण युपीत होणार विरोध

राज यांना फक्त अयोध्येतच विरोध होत नसून संपुर्ण उत्तर प्रदेशात विरोध होत आहे. हे जनआंदोलन आहे. राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांना त्रास दिला आज अयोध्येत पोस्टर लागले पण हे फक्त अयोध्यापुरते नाही तर पुर्ण युपीसंबंधीत आहे. जर मी राज यांना धमकी देत असेल तर आतापर्यंत ते काय करीत होते असेहील बृजभूषण म्हणाले.

राज ठाकरेंनी चुक कबुल करावी

उत्तर भारतीयांना राज यांचे मनसैनिक मारहाण करीत होते. यात आमच्या लोकांचे मृत्यूही झाले. माझा पावित्रा ठरलेला आहे जे चुक केले ते चुक केले असे राज यांनी कबुल करावे. उत्तर भारतीयांना यापुढे त्रास देणार नाही असे त्यांनी स्पष्ट करावे असेही ते म्हणाले

राज ठाकरे मुंबईचे साहेब असतील ते अयोध्येत साहेब नाहीत

माफी मागितल्याशिवाय राज ठाकरे अयोध्येत घुसु शकत नाही. ते मिल्ट्री घेऊनही आले तरी लाखो लोकांच्या मृतदेहावरून त्यांना चालावे लागेल. सरकारचा पावित्रा सरकार ठरवेल, आम्ही आमचा पावित्रा ठरवलेला आहे. राज 'साहेब' मुंबईचे 'साहेब' असतील ते अयोध्येत 'साहेब' नाहीत ते मुंबईच्या बाहेरही जात नाही असा टोलाही त्यांनी लगावला.

राज ठाकरे निर्णय घेतील - वसंत मोरे

यावर वसंत मोरे म्हणाले की, राम सर्वांचे आहेत त्यामुळे राज ठाकरे अयोध्येत येतील. कोरोनाचा कहर सुरु होता तेव्हा आम्हीच उत्तर भारतीयांची मदत केली आणि त्यांना गावी पाठविले. पण बृजभूषण यांच्याबाबतील सर्व निर्णय राज ठाकरे घेतील असेही ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...