आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

64 दिवसांनंतर तुरुंगाबाहेर पडलेल्या कुंद्राची अवस्था:चेहऱ्यावर निराशा, कारमध्येही चेहरा लपवताना दिसला; माध्यमांना टाळून राज घराकडे रवाना

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पोर्नोग्राफी प्रकरणात 19 जुलै रोजी अटक झालेला राज कुंद्रा मंगळवारी दुपारी भायखळा कारागृहातून बाहेर पडला आहे. अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने 50 हजार रुपयांच्या जामिनावर कुंद्राला जामीन मंजूर केला आहे. मात्र, शहर सोडण्यापूर्वी त्यांना स्थानिक पोलिसांना कळवावे लागणार आहे.

कारमध्येही कुंद्रा मीडियाच्या कॅमेऱ्यांना टाळताना दिसला
कारमध्येही कुंद्रा मीडियाच्या कॅमेऱ्यांना टाळताना दिसला

कुंद्रा जीन्स, पँट आणि टी-शर्ट घालून जेलमधून बाहेर पडला. त्याच्या कपाळावर लाल टीका होता आणि चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती. तो बाहेर येताच माध्यमांनी त्याच्यावर प्रश्नांचा वर्षाव केला, पण काहीही न बोलता कुंद्रा सरळ त्याच्या कारमध्ये बसला. कारमध्येही तो मीडियाचे कॅमेरे टाळताना दिसला.

तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर कुंद्रा सतत माध्यमांचे प्रश्न टाळताना दिसला
तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर कुंद्रा सतत माध्यमांचे प्रश्न टाळताना दिसला

कोर्टात कुंद्रा म्हणाला - बळीचा बकरा बनवला जातोय

याआधी, कुंद्राने आपल्या जामीन अर्जात दावा केला होता की, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने या प्रकरणात पुरवणी आरोपपत्र दाखल केले, ज्यात त्याच्याविरोधात कोणतेही पुरावे नाहीत. त्याच्याविरुद्ध कथित संशयास्पद अश्लील सामग्री बनवण्यात सक्रिय सहभाग असल्याचा कोणताही पुरावा नाही. त्याला फक्त बळीचा बकरा बनवले जात आहे. बचाव पक्ष आणि फिर्यादीचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने कुंद्राला जामीन मंजूर केला.

कुंद्राला तुरुंगातून घरी आणण्यासाठी त्याच्या कुटुंबातील काही सदस्य आले होते. मात्र, यात शिल्पा शेट्टीचा सहभाग नव्हता
कुंद्राला तुरुंगातून घरी आणण्यासाठी त्याच्या कुटुंबातील काही सदस्य आले होते. मात्र, यात शिल्पा शेट्टीचा सहभाग नव्हता

कुंद्रा आणि थोरपे यांनी त्यांच्या अटकेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. कुंद्राने उच्च न्यायालयात ऑक्टोबर 2020 मध्ये त्याच्याविरुद्ध नोंदवलेल्या अन्य एका प्रकरणात अंतरिम दिलासा मागितला आहे.

माध्यमांच्या प्रश्नांनी त्रस्त झालेल्या कुंद्रा कपाळावर हात मारताना दिसला
माध्यमांच्या प्रश्नांनी त्रस्त झालेल्या कुंद्रा कपाळावर हात मारताना दिसला
कुंद्राला गर्दीतून जाण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला
कुंद्राला गर्दीतून जाण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला
बातम्या आणखी आहेत...