आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॉर्न फिल्म प्रकरण:पोलिसांची भीती दाखवून पॉर्न शूट केल्याचा मॉडेलचा आरोप; गहना वशिष्ठसह कुंद्राच्या 3 सहकार्‍यांवर एफआयआर दाखल

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नवीन पुरावे गोळा करा - न्यायालय

पोर्न प्रकरणी अटकेत असलेल्या राज कुंद्राच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. राज आणि सहकाऱ्यांनी पोलिसांची धमकी देत अश्लील चित्रपट शूट करून घेतल्याचा आरोप एका मॉडेलने केला आहे. त्यासोबतच मुंबईच्या मलाड येथील मालवणी पोलिस स्टेशनमध्ये गहना वशिष्ठ आणि राज कंपनीच्या 3 निर्मात्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी अशाच एका प्रकरणात गहना वशिष्ठ हिला अटक करण्यात आली होती. या चौघांवर हॉटशॉट आणि इतर काही अॅप्ससाठी अश्लील सामुग्री तयार केल्याचा आरोप आहे.

एका मॉडेलने केली एफआयआर दाखल
या चारही जणांवर ही एफआयआर मॉडेल आणि त्यांच्यासोबत चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्रीने केली आहे. तिच्या तक्रारीत अभिनेत्रीने म्हटले आहे की, हॉटशॉट्स अ‍ॅपसाठी तिला जबरदस्तीने अश्लील शूट करावे लागले. तिने नकार दिल्यास तिचा कंत्राट रद्द व एफआयआर करण्याची धमकी दिली जात होती. आज हे प्रकरण मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलकडे सोपविण्यात येणार आहे.

नवीन पुरावे गोळा करा - न्यायालय
पोर्न फिल्म बनवणे आणि ऑनलाइन वितरित केल्याप्रकरणी राज कुंद्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिस कोठडी समाप्त झाल्यानंतर पोलिसांनी कुंद्राला कोर्टात हजर केले. यावेळी पोलिसांकडून कोठडीत वाढ करण्याची मागणी करण्यात आली. परंतु, आता चौकशी पुरे नवीन पुरावे गोळा करा असे म्हणत कोर्टाने कुंद्राला न्यायालयीन कोठडीत रवाना करण्याचे आदेश दिले.

बातम्या आणखी आहेत...