आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज कुंद्राला मुंबई उच्च न्यायालयाचा झटका:अटक बेकायदेशीर म्हणणारी याचिका न्यायालयाने फेटाळून लावली, वकिलाने म्हटले होते- नोटीस न देता अटक करण्यात आली

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई उच्च न्यायालयाने शनिवारी राज कुंद्राला मोठा धक्का देत त्यांची याचिका फेटाळून लावली. ज्यात त्यांनी त्यांची अटक चुकीची असल्याचे आणि यामध्ये कोर्टाच्या हस्तक्षेपाची मागणी केली होती. कुंद्राच्या वकिलाने मुंबई पोलिसांची कारवाई बेकायदेशीर असल्याचे म्हटले होते. न्यायालयाने या प्रकरणी 2 ऑगस्ट रोजी निकाल राखून ठेवला होता आणि आज निकाल दिला आहे.

कुंद्राच्या वकिलाचे न्यायालयात अपील
राज कुंद्राने त्याच्या अटकेला चुकीचे म्हटले होते. मुंबई पोलिसांनी बेकायदेशीरपणे अटक केल्याचे आणि CRPC चे कलम 41 ए चे पालन केले गेले नसल्याचे म्हटले आहे. कुंद्राविरोधात ज्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यामध्ये जास्तीत जास्त सात वर्षांच्या शिक्षेची तरतूद असल्याचे याचिकेत म्हटले आहे. अशा परिस्थितीत कायदेशीर तरतुदींचे पालन न करता कुंद्राला अटक करणे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. कुंद्राला पोलिसांनी 19 जुलै 2021 रोजी अटक केली आहे.

पोलिसांनी राज कुंद्राला नोटीस दिली नाही
या प्रकरणात पोलिसांनी अटक करण्यापूर्वी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 41 अ अंतर्गत नोटीस जारी केली नसल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. जे अर्नेश कुमार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आवश्यक आहे. या व्यतिरिक्त, कोरोनामुळे कारागृहाची परिस्थिती पाहता सर्वोच्च न्यायालयाने जारी केलेल्या निर्देशांचे पालन केले गेले नाही. त्यामुळे कुंद्राला कोठडीत पाठवण्याचा आदेश बाजूला ठेवून त्याला निर्दोष सोडण्यात यावे. पोलिसांनी कुंद्राविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 292, 293 आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 67 व 67 अ आणि महिलांच्या असभ्य प्रतिनिधित्वाच्या निषेधाशी संबंधित कायद्याच्या तरतुदींखाली गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी 11 जणांना अटक करण्यात आली आहे
19 जुलै रोजी या प्रकरणी राज कुंद्रा, रेयान थोरपे यांच्यासह 11 जणांना पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयाने राज आणि रेयानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

बातम्या आणखी आहेत...