आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिल्पाला माहिती होते कुंद्राचे राज:पतीच्या अडल्ट अॅपविषयी शिल्पा शेट्टीला होती माहिती, कुंद्राने अनेक वेळा खात्यात पैसे मागवले; दोघेही अनेक कंपन्यांमध्ये पार्टनर

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज कुंद्राने मुंबई हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला

पॉर्न फिल्म रॅकेट प्रकरणात मुंबई पोलिसांची टीम अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या जुहू येथील बंगल्याकडे तपासासाठी पोहोचली आहे. पोलिस गेल्या 4 तासांपासून शिल्पाची चौकशी करत आहेत. पॉर्न केसमध्ये अटक केलेल्या राज कुंद्रा (शिल्पाचा नवरा) ला सोबत घेऊन पोलिस गेले आहेत. दोघांना समोरा समोर बसवून प्रश्नोत्तर विचारले जात आहेत.

मुंबई गुन्हे शाखेची टीम सध्या शिल्पाचा जबाब नोंदवत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिल्पा कुंद्राच्या बर्‍याच कंपन्यांमध्ये भागीदार आहे आणि तिला या अ‍ॅप आणि त्यातील कंटेन्टविषयी पूर्ण माहिती होती. मुंबई पोलिसांच्या तपासणीत असे दिसून आले आहे की कुंद्राच्या हॉटशॉट्स अ‍ॅपवर 20 लाखांपेक्षा अधिक सब्सक्राइबर आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंद्राने अनेक वेळा या अॅपमधून होणाऱ्या कमाईची मोठी रक्कम शिल्पाच्या बँक खात्यात मागवली होती. शिल्पावर आरोप आहे की तिने जाणूनबुजून कुंद्राच्या अवैध कामांची माहिती लपवली. शिल्पा ही कुंद्राची अ‍ॅडल्ट कंटेंट कंपनी 'केनरिन' मध्ये भागीदार देखील आहे. बऱ्याच मुलींनी आपल्या जबाबात असेही म्हटले आहे की, अॅक्टिंगमध्ये येण्यापूर्वी शिल्पाशी त्यांचे बोलणे करुन दिले होते.

राज कुंद्राने मुंबई हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला
तर राज कुंद्राने आपल्या अटकेविरोधात मुंबई उच्चन्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. कुंद्राने आपली अटक ही अवैध असल्याचे म्हटले आहे. त्याचे म्हणणे आहे की, पोलिसांनी त्याला 41A अंतर्गत नोटीस दिली नव्हती. 41A ची नोटीस पोलिसांसमोर हजर राहण्यासाठी असते. जर व्यक्तीने या सूचनेचे पालन केले तर त्याला अटक केली जाऊ शकत नाही, त्याला फक्त चौकशीसाठी नेले जाऊ शकते.

कुंद्रा 27 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत आहे
राज कुंद्रा यांची पोलिस कोठडी शुक्रवारी संपत होती, परंतु एस्प्लेनेड कोर्टाने ही कोठडी 27 जुलैपर्यंत वाढवली आहे. त्याचा सहकारी रेयान थॉर्पे यालाही 27 जुलैपर्यंत कस्टडीमध्ये पाठवण्यात आले आहे. कुंद्रा सध्या भायखळा कारागृहात आहे. पोलिस कोठडीत असलेल्यांना येथे ठेवले जाते. फेब्रुवारी 2021 मध्ये उघडकीस आलेल्या पॉर्न फिल्म रॅकेटच्या प्रकरणात आतापर्यंत राज कुंद्रासह 11 जणांना अटक करण्यात आली आहे.

शुक्रवारी कुंद्रा न्यायालयात हजर असताना मुंबई पोलिसांनी आणखी एक खुलासा केला आहे. पोलिसांनी सांगितले की, कुंद्रा आंतरराष्ट्रीय स्तरावर 121 पॉर्न व्हिडिओ 9 कोटी रुपयांना विकणार होता.

बातम्या आणखी आहेत...