आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:कुंद्रावर फेमा व पीएमएलएअंतर्गत गुन्हा दाखल होणार, शिल्पा शेट्टीने हॉटशॉट ॲपचे खापर मेहुण्यावर फोडले

नवी दिल्ली/मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पोर्न चित्रपट रॅकेट प्रकरणात आता प्रवर्तन ईडीचीही एंट्री होण्याची शक्यता आहे. ईडी कुंद्रावर मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) आणि परकीय चलन व्यवस्थापन कायद्यान्वये (फेमा) गुन्हा दाखल करण्याच्या तयारी आहे.

सूत्रांनुसार, ईडी लवकरच मुंबई पोलिसांकडे या प्रकरणातील एफआयआर मागणार आहे. या प्रकरणात भारत आणि ब्रिटनमधील आर्थिक व्यवहार उघड झाला आहे. राज व त्यांच्या कंपनीच्या यस बँकेतील खाती आणि यूबीए खात्यांतील व्यवहारांची चौकशी करण्यात येणार आहे. याबाबतीत कंपनीच्या इतर गुंतवणूकदारांची चौकशी होऊ शकते. तसेच ईडी आता शिल्पा शेट्टीचीही चौकशी करणार आहे.

राज कुंद्रा पोर्न निर्मितीत सहभागी नाही : शिल्पा
सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार, शिल्पा शेट्टीने चौकशीत पोलिसांना सांगितले की, राज कुंद्राच्या बहिणीचे पती प्रदीप बक्षी हेच हॉटशॉट ॲप चालवत होते. आपल्याला हॉटशॉटच्या कंटेंटबाबत काहीही माहिती नव्हती. शिल्पा शेट्टीने दावा केला की, ‘हॉटशॉट अॅपशी आपले काहीही देणेघेणे नाही. इरॉटिक (प्रौढांसाठी) कंटेट हा पोर्न कंटेंटपेक्षा (अश्लील) वेगळा असतो. माझे पती राज कुंद्रा पोर्न कंटेंटच्या निर्मितीत सहभागी नाहीत. ते पूर्णपणे निर्दोष आहेत. या प्रकरणासाठी लंडनमध्ये राहणारा त्यांचा मेहुणा प्रदीप बक्षी हाच सर्वस्वी जबाबदार आहे.’

बातम्या आणखी आहेत...