आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरे सहकुटुंब सिद्धीविनायकाच्या चरणी लीन:पुत्र अमित ठाकरे, नातु किआनची उपस्थिती

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सिद्धीविनायकाचे दर्शन घेतले आहे. यावेळी राज ठाकरे यांचे कुटुंबिय त्यांच्यासोबत होते. गणेशोत्सवानिमित्त राज ठाकरेंनी बाप्पांचे दर्शन घेत अवघे ठाकरे कुटुंबीय सिद्धीविनायकाच्या चरणी लीन झाल्याचे पाहायला मिळाले.

यावेळी पत्नी शर्मिला ठाकरे, पुत्र अमित ठाकरे, सून मिताली ठाकरे, कन्या उर्वशी ठाकरे यांची उपस्थिती होती. तसेच अमित ठाकरेंचे पुत्र किआनची उपस्थिती चर्चेचा विषय ठरला. येथील व्हिडीओत राज ठाकरे यांनी नातू किआन याला आधी आशीर्वादरुपी शाल देण्याचा आग्रह पुजाऱ्यांकडे धरल्याचे दिसून आले.

राज ठाकरेंनी आपल्या नव्या शिवाजी पार्क येथील शिवकुंज या निवासस्थानी देखील बाप्पांची स्थापना केली होती. नुकतेच आजोबा झालेल्या राज ठाकरेंनी यंदा नातवाला घेऊन सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. यावेळी पुजाऱ्यांनी 4 महिन्यांच्या किआनला देखील टिळा लावत त्याच्या खांद्यावर उपरणे टाकले. यावेळी आजोबा राज त्याच्या बाललीलांकडे कौतुकाने पाहत होते.

बातम्या आणखी आहेत...