आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Raj Thackeray Discusses With CM Uddhav Thackeray, Says People Coming From Other States Increase The Number Of Corona Patients In Maharashtra

ठाकरे बंधूंची चर्चा:राज ठाकरेंनी केली मुख्यमंत्र्यांशी चर्चा, म्हणाले - 'बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या लोकांमुळे राज्यात वाढतेय कोरोना रुग्णांची संख्या'

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री आणि त्यांच्यातील चर्चेविषयी माहिती दिली.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत सोमवारी चर्चा केली. या चर्चेत नेमके कोणत्या विषयांवर बोलणे झाले याविषयी त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढण्यामागे बाहेरच्या राज्यातून येणारी लोकं जबाबदार आहेत. पश्चिम बंगाल वैगेरे इतर राज्यांमध्ये लाटा येत नाहीत असेही ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांची पाठराखण करत राज ठाकरे म्हणाले की, इतर राज्यांमध्ये रुग्ण मोजले नाहीत यामुळे तिथली परिस्थिती समोर येत नाहीय.

राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री आणि त्यांच्यातील चर्चेविषयी माहिती दिली. राज ठाकरे म्हणाले की, 'काल मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन केला होता. लॉकडाऊनबाबत बोलण्यासाठी त्यांच्याकडे भेटीची वेळ मागितली होती. मात्र त्यांच्या आजूबाजूला कोविडचे रुग्ण असल्याने ते क्वॉरंटाईन आहेत. त्यामुळे त्यांची भेट घेता येऊ शकली नाही. म्हणून झूम अॅपवरून आम्ही चर्चा केली. त्यात कोविड आणि लॉकडाऊनबाबत चर्चा झाल्याचे ठाकरे म्हणाले.

परप्रांतीयांमुळे कोरोना वाढतोय - राज ठाकरे
बाहेरच्या राज्यातून येणारी माणसे आणि त्यांची न झालेली चाचणी यामुळे कोरोना महाराष्ट्रात वाढत आहे. तसेच इतर राज्यात कोरोना रुग्णांची चाचणीच केली जात नाही यामुळे आकडे समोर येत नाहीत. महाराष्ट्रात कोरोनाची टेस्टिंग केली जात आहे. त्यामुळे कोरोनाचे आकडे बाहेर येत आहेत. पुढे ते म्हणाले की, मागच्या वर्षी कोरोना सुरू झाल्यावर लोक आपापल्या राज्यात परतत होते. तेव्हाच मी म्हणालो होत की, ही लोक जेव्हा राज्यात परत येतील तेव्हा या लोकांची मोजणी करावी त्यांची चाचणी करावी. परंतु, त्याकडे लक्ष देण्यात आलेले नाही. कुणाचीही मोजणी आणि चाचणी केली नाही. त्यामुळे ही संख्या वाढत आहे. कोण येते कोण जाते हे कोणालाही कळत नाही. आज कोरोना आहे, उद्या दुसरे काही असेल. हे दुष्टचक्र न थांबणारे आहे.

पश्चिम बंगाल वैगेरे इतर ठिकाणी काही लाटा नाही
राज ठाकरेंनी यावेळी इतर राज्यांमध्ये कोरोना रुग्ण का नाहीत याचे कारणही सांगितले आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्र औद्योगिक राज्य असल्याने बाहेरील येणाऱ्या लोकांची संख्या खूप जास्त आहे. पश्चिम बंगाल वैगेरे इतर ठिकाणी काही लाटा वैगेरे आल्याचे ऐकालया मिळालेले नाही. महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या वाढण्यामागे परप्रांतांमधून येणारी लोक आहेत. तसेच इतर राज्यांमध्ये कोरोना रुग्ण मोजले जात नाहीत. त्यामुळे तेथील आकडे वाढत नसल्याचे राज ठाकरे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...