आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअजित पवारांची राज्यात चर्चाच चर्चा असताना मनसे प्रमुख आणि प्रसिद्ध व्यंगचित्रकार राज ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे व्यंगचित्र काढले. यापुढेही त्यांनी 'गप्प बसा' असा सल्ला अजित पवारांना दिला. या व्यंगचित्राची चर्चाच चर्चा होत आहे.
यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आज राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या अध्यक्षृ समितीची बैठक झाली. यात शरद पवार यांचा राजीनामा एकमताने फेटाळून लावण्यात आला. या निर्णयानंतर अजित पवारांची कोंडी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे, असे असतानाच आता व्यंगचित्रातून राज ठाकरेंनी लगावलेल्या फटकाऱ्याने अजित पवारांबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. शरद पवारांचा राजीनामा मंजूर न झाल्याने अजित पवारांची कोंडी झाल्याचीही चर्चा आहे.
जागतिक व्यंगचित्र दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे आंतरराष्ट्रीय महोत्सव 2023 चे उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. यावेळी राज ठाकरे यांनी सर्व व्यंगचित्र पाहून कलाकार मंडळींच कौतुक देखील यावेळी केले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी राज ठाकरे यांच्याकडे व्यंगचित्र काढण्याचा आग्रह धरला होता.
काय म्हणाले राज ठाकरे?
यावेळी राज ठाकरे यांनी गेली दोन चार दिवस जे काही चालले, ते पाहून अजित पवार यांचे चित्र काढण्याचा प्रयत्न करतो असे म्हटले. यासह ते ''मला ते कितपत येईल ते माहिती नाही.'' असे त्यांनी उपस्थितीताना सांगितले.
तीनच मिनिटांत काढले व्यंगचित्र
राज ठाकरे यांनी यावेळी केवळ तीन मिनिटात अजित पवार यांचे व्यंगचित्र काढले होते आणि ते पूर्ण होताच, आता पुढे काय लिहू ‘आता गप्प बसा’ अस राज ठाकरे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हषा पिकला. यावर आता अजित पवारांचीही तितकीच प्रभावशाली प्रतिक्रीया असेल हे सांगायला नको.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.