आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अहमद पटेल यांना श्रद्धांजली:'सत्तेच्या पदांच्या मोहात न पडणे हा गुण दुर्मिळच...' राज ठाकरेंनी दिला अहमद पटेल यांच्या आठवणींना उजाळा

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या खंडप्राय देशाच्या कानाकोपऱ्यातील सर्वपक्षीय राजकीय नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते - राज ठाकरे

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे कोरोनाने निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर देशभरातील राजकीय नेत्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पटेल यांच्या स्वभावाचे पैलू उलगड श्रद्धांजली वाहिली आहे. राज यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

राज ठाकरेंनी लिहिले की, 'काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल ह्यांचं कोरोनाने निधन झाले. अहमद पटेल कमालीचे चाणाक्ष, बुद्धिमान नेते होते, राजकारणाला बुद्धिबळाच्या पटावर ठेवून डाव-प्रतिडाव खेळण्यात ते माहीर होते, पण ही असाधारण क्षमता त्यांनी राजकीय लढाया जिंकण्यापुरतीच वापरली, तिला कधी त्यांनी व्यक्तिगत हेवेदावे ह्यासाठी वापरले नाही. त्यामुळेच ह्या खंडप्राय देशाच्या कानाकोपऱ्यातील सर्वपक्षीय राजकीय नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते.'

तसेच पुढे ठाकरेंनी लिहिले की, 'राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांचा एखाद्याशी स्नेह तयार झाला की, त्या व्यक्तीच्या व्यक्तिगत आयुष्यातील सुखदुःखांच्या प्रसंगात ते ठाम उभे राहत याचा अनुभव मी देखील घेतला आहे. ४३ वर्ष सक्रिय राजकारणात राहून, आणि अहमद पटेल यांचं निवासस्थान अनेक सत्तांतराचं केंद्रस्थान होऊन देखील स्वतः सत्तेच्या पदांच्या मोहात न पडणं हा गुण दुर्मिळच. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अहमद पटेल ह्यांना विनम्र श्रद्धांजली' असे म्हणत राज ठाकरेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

काँग्रेस नेता अहमद पटेल यांचे वयाच्या 71 वर्षी बुधवारी निधन झाले. पटेल यांना 1 ऑक्टोबर रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यांना 15 ऑक्टोबर रोजी गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात दाखल केले होते. पटेल यांनी कोरोना झाल्याची माहिती देताना सर्व निकटवर्तीय आणि संपर्कात आलेल्या लोकांना स्वतःला क्वारंटाइन करण्याचे आणि कोरोनाची चाचणी करण्याचे आवाहन केले होते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser