आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा''काहींना बाळासाहेब ठाकरे असल्यासारखे वाटते, राज ठाकरे आता हिंदुत्वाची शाल पांघरत आहेत. राज ठाकरे म्हणजे केमिकल लोचाची केस आहे, कधी मराठीच्या कधी हिंदुत्वाच्या नादाला लागतात यांनी कधी जनतेची कामं केलीत का? असा खणखणीत सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.
मुंबईतील बिकेसी मैदानावरील सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा सुरु आहे. या सभेत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढविला.
''आज यांना हिंदुत्वाचा खोटा पुळका आला आहे, पण शिवसेनेचे हिंदुत्व नसते तर आज तुम्हीसुद्धा भोंग्यात असता असा टोलाही राज ठाकरेंसहीत भाजपलाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी लगावला.
राज ठाकरेंवर जोरदार टीका
''लगे रहो मुन्नाभाई चित्रपटासारखीच राज ठाकरे यांची स्थिती आहे. लगे रहो मुन्नाभाई चित्रपटात संजय दत्तला गांधीजी दिसतात मग संजय दत्तही गांधीगीरी करतो, तशीच केस आपल्याकडे आहे. शाल घेऊन फिरतात हल्ली. कधी मराठीच्या तर कधी हिंदुत्वाच्या नादाला लागतात. चित्रपटातील मुन्नाभाईने लोकांचे भले करीत होता हा कुठला मुन्नाभाई? चित्रपटात शेवटी संजय दत्तला समजते की आपल्या डोक्यात केमिकल लोचा झाला'' अशीच गत राज ठाकरेंची आहे असे नाव न घेता उद्धव ठाकरे यांनी राज यांच्यावर शरसंधान साधले.
तमाशे बंद करा, सोबत या
आज जे काही तमाशे राज्यात सुरु आहेत ते बंद करा, एकत्र या मी पुढे पाऊल टाकतो असे सांगत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचा समाचार घेतानाच आमचे माझे सरकार मजबूत आहे; त्यापेक्षाही जास्त मजबूत आमचे शिवसेनेचे मावळे आहेत असेही त्यांनी ठणकावले.
हिरवा मास्क घातल्यासारखे मुख्यमंत्री बोलले
आपण गर्दी आणली पण शिवसैनिकांच्या सभेत जोश दिसला नाही. भोंगे आणि रस्त्यावरील नमाज यावर मुख्यमंत्री काहीच बोलले नाही. आज भगवा मास्क निघाला आणि हिरवा मास्क घातल्यासारखे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून बोलले की मुख्यमंत्री म्हणून समजलं नाही असेही गजानन काळे यांनी प्रतिक्रीया दिली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.