आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेच्या वाट्याला गेल्यानेच मुख्यमंत्रिपदावरुन जावे लागले:राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला; बृजभूषण सिंह यांच्यावरही टीका

मुंबई12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 13 आमदार सोरटवर निवडून आले का? भाजपने लक्षात ठेवावे भरतीनंतर आहोटी येते
  • संदीप देशपांडेंवरील हल्लावरुन राज ठाकरेंचा इशारा

संदीप देशपांडेवर जो हल्ला त्यावर मी बोललो नाही. मात्र, माझ्या मुलांचे रक्त वाया घालणार नाही, आधी ज्याने हल्ला त्याला कळेल आणि मग सर्वांना कळेल असे म्हणत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्लावरुन इशारा दिला आहे.

प्रत्येक पक्षाच्या इतिहासात भरती-ओहोटी आलेली आहे, 65 वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसची आजची अवस्था काय आहे? त्यामुळे आज भरती आहे... उद्या ओहोटी येणार हे भाजपने लक्षात ठेवावं, आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 17 वा वर्धापनदिन आहे. या निमित्त ठाण्याच्या गडकरी रंगायथनमध्ये मनसे कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते असे म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला

राज ठाकरे म्हणाले की, आपल्या नादाला कुणी लागायला नको, माझ्या आयोध्या दौऱ्याला ज्यांनी विरोध केला त्यांचे काय झाले असा सवाल करत राज ठाकरेंनी खासदार बृजभूषण सिंह यांना टोला लगावला आहे. तर दुसरीकडे माझ्या मनसैनिकांवर गुन्हे दाखल केल्यामुळे अडीच वर्षांत मुख्यमंत्रीपद गेले असा टोला उद्धव ठाकरेंचे नाव न घेता लगावला आहे.

आपण सत्तेपासून दूर नाही

राज ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, येणाऱ्या काळात आपण मनपामध्ये सत्तेत येणार आहोत. आपण सत्तेपासून दूर नाही, तुम्ही लोकांपर्यंत पोहचा मी सुद्धा प्रत्येक मतदारसंघात प्रचारासाठी येईल, असे म्हणत राज ठाकरेंनी मनसैनिकांमध्ये नव चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यात सध्या खूप खालच्या पातळीचे राजकारण सुरू आहे. इतकं गलिच्छ राजकारण मी यापूर्वी कधीही पाहिले नाही असे मत राज ठाकरेंनी व्यक्त केले.

राज ठाकरे म्हणाले की, काही पत्रकार हे ठरवून आपली बदनामी करतात, असे म्हणतानाच 13 आमदार सोरटवर निवडून आले का?असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. तर भरतीनंतर आहोटी येत असते, हे भाजपने देखील लक्षात ठेवले पाहिजे असा सल्ला दिला आहे. तर मशिदीवरील भोंग्यांचा समाचार मी 22 तारखेला घेईल असा इशाराच राज ठाकरेंनी दिला आहे. सर्व आंदोलनाच्या जबाबदाऱ्या काय आमच्या आहेत का असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

राज ठाकरे म्हणाले की, नाशिक मनपामध्ये पुढील 50 वर्षांचा पाण्याचा प्रश्न मनसेनी मार्गी लावला आहे. यात कुणावर कधीच गैरव्यवहार केल्याचा आरोप झाला नाही, लोक आता गेल्या 5 वर्षांत हळहळ व्यक्त करत आहेत. मात्र निवडणुकीच्या वेळेला ही हळहळ राहिल का नाही माहिती नाही म्हणत मतदान न होण्याची खंत व्यक्त केली.

लाव रे तो व्हिडिओ

आमच्यामुळे मोबाईच्या कंपन्यानी मराठी भाषा सुरू केली म्हणत राज ठाकरेंनी पुन्हा लाव रे तो व्हिडिओची सुरूवात केली आहे. मराठी चित्रपटासाठी स्क्रीन आपल्यामुळेच झाल्या, मराठी पाट्या करण्यामागे ही मनसेचा हात आहे, असे राज ठाकरेंनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...