आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वसंत मोरेंचा 'सर्वधर्म समभाव':मुस्लिम बांधवांच्या हस्ते कात्रजमध्ये महाआरती! राज ठाकरे गैरहजर, भूमिकेलाही बसली सणसणीत चपराक

पुणे10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे यांनी आयोजित केलेल्या कात्रज येथील हनुमानाच्या महाआरतीला मनसे प्रमुख राज ठाकरे गैरहजर राहीले; त्यामुळे आता राज ठाकरे आणि वसंत मोरे यांच्यातीत बेबनाव दिसून येत आहे. या महाआरतीला विशेषतः मुस्लिम बांधवांनीही उपस्थिती लावली असून त्यांच्याही हाताने ही महाआरती करण्यात आली आहे. यामुळे वसंत मोरे यांचा सर्वधर्म समभाव दिसून आला असून त्यांच्या या कृतीमुळे मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या भूमिकेलाच चपराक बसली आहे.

वसंत मोरे आधीच्या आरतीला गैरहजर आता आयोजकच

राज ठाकरे यांनी आझाद मैदानातील सभेत मशिदीवरील भोंगे काढण्याची भाषा केली. यावरुन मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. यानंतर त्यांनाही मनसेकडून टीका सहन करावी लागली. यानंतर खालकर चौकातील महाआरतीला वसंत मोरे गैरहजर होते. त्यानंतर पक्षनैतृत्व आणि मोरे यांच्यात दिलजमाई झाल्यानंतर ते ठाणे येथील उत्तर सभेत आले त्यांनी भाषणही त्यावेळी केले होते. याचदरम्यान हनुमान जयंतीला पुण्यातील खालकर चौकात झालेल्या महाआरतीला वसंत मोरे गैरहजर होते त्यानंतर यावेळी होणाऱ्या महाआरतीचे आयोजकच वसंत मोरे आहेत.

राज ठाकरे यांच्या महाआरतीसाठी मनसेकडून सुरु असलेली तयारी
राज ठाकरे यांच्या महाआरतीसाठी मनसेकडून सुरु असलेली तयारी

व्यासपीठही उभारले

राज ठाकरे यांच्या महाआरतीसाठी मनसेने पुण्यातील कात्रज येथील कार्यालयासमोर जय्यत तयारी सुरु केली आहे. यासाठी पक्षाचे महत्वाचे नेते आणि माजी नगरसेवक वसंत मोरे हे कटाक्षाने लक्ष देत आहेत. मंदीरासमोर व्यासपीठही उभारण्यात आले असून भगव्या रंगात सजावटीचे कामही सुरु झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...