आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामशिदींवरील भोंग्यांच्या विषयाला कायमचे संपवायचे आहे. त्यात जराही कुचराई नको, कामाला लागा, असे आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका पत्रातून आपल्या कार्यकर्त्यांना दिले आहेत. हे पत्र लोकांपर्यंत पोहचवा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
मनसैनिकांना लिहिलेल्या पत्रात काय?
माझ्या प्रिय महाराष्ट्र सैनिकांनो, अशी सुरुवात असलेल्या पत्रात राज ठाकरे म्हणतात की, मशिदींवरील भोंग्यांच्या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हात घातल्यानंतर राज्यातलेच नव्हे तर देशातले राजकारण ढवळून निघाले. आता हा विषय आपल्याला कायमचा संपवायचा आहे. त्यासाठी आपला विचार प्रत्येकापर्यंत पोहोचायलाच हवा. म्हणूनच माझे एक पत्र मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेत आपल्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आले आहे. ते त्यांच्याकडून घ्या आणि कामाला लागा. तुम्ही एकच करायचे आहे. माझे पत्र तुम्ही राहता त्या परिसरातील - घराघरात स्वतः नेऊन द्यायचे आहे. कारण व्यापक लोकसहभागाशिवाय आपले हे आंदोलन यशस्वी होणार नाही. मला खात्री आहे; जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पत्र पोहोचवण्याच्या कामात तुमच्याकडून जराही कुचराई होणार नाही.
पत्रातून जनतेला 3 सूचना
राज ठाकरेंची भूमिका
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर सध्या संपूर्ण राज्याचे राजकीय व सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. भोंगा हा धार्मिक नाही, तर सामाजिक विषय आहे. प्रत्येकाने आपापला धर्म घरात ठेवावा, तो रस्त्यावर आणू नये. एक, दोन दिवस आपण समजू शकतो. मात्र, 365 दिवस जर या गोष्टी सुरू असतील तर ते योग्य नाही. आम्ही आमच्या कानाला का त्रास करून घ्यायचा. म्हणून हा विषय थांबला पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.