आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Raj Thackeray Loud Speaker Ultimatum Vs Hanuman Chalisa । MNS Workers Played Hanuman Chalisa On Loudspeaker During Namaz In Thane Nashik, 7 Women Arrested

मनसेचा 'लाऊड' अल्टिमेटम:ठाणे-नाशिकमध्ये नमाजाच्या वेळी लाऊडस्पीकरवर वाजवली हनुमान चालिसा, 7 महिला ताब्यात

मुंबई25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोलिसांच्या कडक बंदोबस्तानंतरही आज अजानच्या वेळी दुप्पट आवाजात हनुमान चालिसा वाजवण्याच्या निर्णयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) ठाम असलेली दिसली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर औरंगाबादमध्ये प्रक्षोभक भाषणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. असे असतानाही त्यांनी मनसे कार्यकर्त्यांना ताकद दाखवण्याचे आवाहन केले आहे.

राज ठाकरेंच्या या आवाहनानंतर ठाण्यातील चारकोप परिसरात पहाटे 5 वाजता मनसे कार्यकर्त्यांनी नमाजच्या वेळी लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा वाजवली. तर नाशिकमध्ये नमाजच्या वेळी हनुमान चालिसा वाजवल्याप्रकरणी 7 महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका संदेशात राज यांनी सर्व नागरिकांना हिंदूची ताकद दाखवण्यास सांगितले. याशिवाय आता तसे झाले नाही तर कधीच होणार नाही, असेही ते म्हणाले. राज ठाकरे म्हणाले, 'मी तमाम हिंदूंना आवाहन करतो की, जर तुम्ही 4 मे रोजी लाऊडस्पीकरवरून अजान ऐकाल तर त्या ठिकाणी लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा वाजवून उत्तर द्या. तरच त्यांना या लाऊडस्पीकरच्या त्रासाची जाणीव होईल.'

हनुमान चालिसा पठण करताना महाराष्ट्रातील अनेक भागांतून मनसे कार्यकर्त्यांना पकडले जात आहे.
हनुमान चालिसा पठण करताना महाराष्ट्रातील अनेक भागांतून मनसे कार्यकर्त्यांना पकडले जात आहे.

लाऊडस्पीकर वाजताना दिसल्यास 100 क्रमांकावर तक्रार करा

ते पुढे म्हणाले की हिंदू सण, शाळा आणि रुग्णालयांसमोरील सायलेन्स झोनमध्ये बंदी असतानाही मशिदींना अशा निर्बंधांपासून सूट देण्यात आली आहे. ते म्हणाले, 'मी सर्व हिंदूंना हनुमान चालिसाचे पठण करण्याचे आवाहन करतो, सर्व स्थानिक मंडळांनी आणि जागरूक नागरिकांनी याविरोधात स्वाक्षरी मोहीम सुरू करावी आणि जर कोणी मशिदींमधून लाऊडस्पीकर वाजवताना ऐकले तर दररोज स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये विनंती पत्र सादर करा. नागरिकांनी दररोज 100 क्रमांक डायल करून तक्रार नोंदवावी.

सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या संदेशात राज यांनी सर्व नागरिकांना हिंदूची ताकद दाखवण्यास सांगितले.
सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या संदेशात राज यांनी सर्व नागरिकांना हिंदूची ताकद दाखवण्यास सांगितले.

'मंदिरात लाऊडस्पीकर वाजवण्यासाठी हिंदूंना परवानगी हवी'

आपल्या वक्तव्यात राज ठाकरे पुढे म्हणाले की, सुप्रीम कोर्टाने लाऊडस्पीकरसाठी एक नियम निश्चित केला आहे. हा आवाज 10 ते 55 डेसिबल दरम्यान असावा. कृपया लक्षात घ्या की 10 डेसिबल पातळी आपल्यादरम्यान होणाऱ्या गप्पांशी संबंधित आहे. 55 डेसिबलची पातळी आपल्या स्वयंपाकघरात असलेल्या मिक्सरच्या आवाजाइतकी असते. ते म्हणाले की, मशिदींना लाऊडस्पीकर वाजवण्याची परवानगी देण्यात आली आहे आणि जर हिंदू मंदिरांना लाऊडस्पीकर वाजवायचे असतील, तर आम्हाला दररोज परवानगी घ्यावी लागते."

'रस्त्याच्या मधोमध बसून ट्रॅफिक जाम करतात'

मुस्लिमांनी रस्त्यावर नमाज अदा करण्यावरही मनसे प्रमुखांनी आक्षेप घेतला. ते म्हणाले, 'कोणता धर्म उपदेश करतो की एकत्र जमून रस्त्याच्या मधोमध बसून प्रार्थना करा आणि ट्रॅफिक जाम करा? मुस्लिम समाजासाठी माझ्या विधानांचे मुख्य कारण म्हणजे ते (लाऊडस्पीकर) जनतेला प्रभावित करणारी एक सामाजिक समस्या आहे.

मनसेच्या अल्टिमेटमदरम्यान मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे स्वतः रस्त्यावर उतरून कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला.
मनसेच्या अल्टिमेटमदरम्यान मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे स्वतः रस्त्यावर उतरून कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला.

'सर्व हिंदूंना अटक करू शकाल, एवढे तुरुंग नाहीत'

राज पुढे म्हणाले, 'मी पुन्हा सांगतो की प्रत्येक नागरिकाला हिंदू असण्याचे सामर्थ्य माहिती असले पाहिजे. आपल्या देशात (सर्व) हिंदूंना अटक करण्याइतके तुरुंग नाहीत. मनसे प्रमुखांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आठवण करून दिली की त्यांचे दिवंगत वडील बाळासाहेब ठाकरे हे मशिदींवरून लाऊडस्पीकर खाली उतरवण्याविषयी बोलले होते."

औरंगाबादमध्ये सभा घेतल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औरंगाबादमध्ये सभा घेतल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या विधानाची आठवण करून दिली

राज ठाकरे म्हणाले, 'मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो की, वर्षापूर्वी शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, सर्व लाऊडस्पीकर बंद करणे आवश्यक आहे. तुम्ही ते पाळणार आहात की तुम्हाला सत्तेत ठेवण्याची जबाबदारी असलेल्या धर्मनिरपेक्ष शरद पवारांच्या मागे जाणार आहात? महाराष्ट्रातील जनतेला सांगा काय होणार आहे?' 'आता नाही तर कधीच नाही' या नव्या घोषणेसह राज यांनी आपले आवाहनाचा शेवट केला.

रिपाइं कार्यकर्ते मशिदीबाहेर तैनात राहणार

त्याचवेळी, राज ठाकरेंच्या आवाहनानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (आरपीआय-ए) आपल्या कार्यकर्त्यांना मशिदीबाहेर तैनात राहण्याचे निर्देश दिले आहेत. जर कोणी जबरदस्तीने मशिदीतून लाऊडस्पीकर काढण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याचे संरक्षण करू, असे पक्षाचे मुख्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले होते.

मुंबईतील संघर्षाच्या शक्यतेमुळे 465 जणांना शहराबाहेर पाठवण्यात आले

मुंबई पोलिसांनी राज ठाकरे यांना आयपीसी कलम 149 अंतर्गत नोटीस बजावली आहे. पोलिसांनी मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिनाभरात शहरातील 1144 मशिदींपैकी 803 मशिदींनी नियमानुसार लाऊडस्पीकर लावण्याची परवानगी घेतली आहे.

राज ठाकरेंच्या अल्टिमेटमबाबत मुंबई पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार, 4 मे रोजी मुंबईत गोंधळ घालण्यासाठी आणि अशांतता निर्माण करण्यासाठी बाहेरून लोक येणार होते. त्यामुळे मंगळवारी पोलिसांनी 855 जणांना कलम 149 अंतर्गत नोटीस दिली आहे. यापैकी 465 जणांना सीआरपीसी 144 अंतर्गत 15 दिवसांसाठी मुंबईबाहेर पाठवण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र पोलिसांना दिली पूर्ण सूट

राज यांच्या या आदेशानंतर पोलिसांनी मुंबईसह संपूर्ण राज्यात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पोलिसांना सूट देताना म्हटले की, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणाच्या आदेशाची वाट पाहू नका. दरम्यान, मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...