आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॉकडाऊन:विनामास्क आलेल्या राज ठाकरेंचा, परप्रांतीयांना तपासणीशिवाय राज्यांत प्रवेशास विरोध

मंुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लॉकडाऊन संपल्यानंतरचा एक्झिट प्लॅन काय आहे - राज ठाकरे

कोरोनावर विचार विनिमयासाठी बोलावलेल्या बैठकीत विनामास्क सहभागी झालेले मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी परराज्यातील कामगारांना परत येताना त्यांची तपासणी केल्याशिवाय प्रवेश देऊ नये असा सल्ला देऊन लॉकडाऊन संपल्यानंतरचा एक्झिट प्लॅन काय आहे असा सवालही उपस्थित केला. तर वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी कुणाचाही पगार कापू नका,अशी विनंती सरकारला केली.

राज ठाकरे म्हणाले, परप्रांतीय कामगारांसाठी परत येताना त्यांची तपासणी केल्याशिवाय महाराष्ट्रात घेऊ नये अशी सूचना करतानाच लॉकडाऊन संपेल, तेव्हा त्याचा एक्झिट प्लॅन काय? हा प्रश्नही उपस्थित केला. तो कसा काढणार, काय सुरु होईल, काय बंद होईल, ते लोकांना सांगावे. महाराष्ट्रातील कारखाने उद्योग बंद होऊ नयेत, म्हणून राज्यातील तरुण तरुणींना ज्या ठिकाणी रोजगार उपलब्ध आहेत त्याची माहिती द्यावी. आपल्याकडे विदर्भ मराठवाडा याठिकाणी त्यांना रोजगाराविषयी माहिती नसते. पोलिस थकले असून आता एसआरपीएफ तैनात करावे. रमझान असल्याने अनेक ठिकाणी गर्दी होते. लोक बाहेर पडतात. अनेक सण घरात राहून साजरे केले. त्यामुळे मुस्लिम समाजानेही त्याचा विचार करावा.

कोणाचाही पगार कापू नका : प्रकाश अांबेडकर : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी, कापूस खरेदी थांबवू नये, रब्बीचे पीक शेतकऱ्यांच्या घरात आहे. ते एपीएमसीने विकत घ्यावे. अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित करतांना शेतीकडे लक्ष द्या, कोणाचाही पगार कापू नका. रिक्षा, हातगाड्या, घेतलेल्यांचे कर्जाचे हप्ते थकले आहेत. ते पुनर्गठीत करावेत. दुकाने उघडायला लावली आहेत. मजुरांना कमीतकमी वेतन दिलेच पाहिजेत ही मागणी केली. 

असंघटित कामगारांना उत्पन्नाचा आधार द्यावा : दरेकर

क्वाॅरंटाइटन केंद्रांमध्ये अधिक सुविधा द्याव्यात. त्यांना भोजन मिळावे यासाठी आढावा घ्यावा. शेतीमाल, आंब्याला, भाजीपाल्याला बाजारपेठ नाही, त्यामुळे मार्केटिंगची व्यवस्था करावी. असंघटित कामगार, मोलकरणी यांच्या उत्पन्नाची शाश्वती नाही, त्यांना आधार द्यावा. मोडकळीस आलेल्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी परवानगी द्यावी, कोकणातल्या लोकांसाठी विशेष रेल्वे सोडाव्यात, मालमत्ता कर , उपकर स्थगित करावा अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...